शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

नाशिक-पुणे महामार्गावर अपघात; कारच्या धडकेत मालवाहू चारचाकी पलटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 5:08 PM

चालचाकी मालवाहू वाहन एमएच १५ जीव्ही २०४२ घेऊन चालक तुषार बागुल मंगळवारी (दि.११) दुपारी एक वाजेच्या सुमारास नाशिक रोडकडून सिन्नरच्या दिशेने जात होते

मनोज मालपाणी 

नाशिकरोड :  नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे गावाजवळील बंगाली बाबा दर्गासमोर चारचाकी कार ओव्हरटेक करीत असताना  कारने दुसऱ्या मालवाहू चारचाकी वाहनाला धडक दिल्याने मालवाहू वाहन उलटून अपघातात झाला, सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र दोन्हीही वाहनांचे नुकसान झाले आहे. 

चालचाकी मालवाहू वाहन एमएच १५ जीव्ही २०४२ घेऊन चालक तुषार बागुल मंगळवारी (दि.११) दुपारी एक वाजेच्या सुमारास नाशिक रोडकडून सिन्नरच्या दिशेने जात होते. यावेळी शिंदे गाव, बंगाली बाबा दर्गासमोर पाठीमागून आलेल्या चारचाकी कार आय ट्वेन्टी (एमएच १५ ईपी ०३०६) ही मालवाहू वाहनाला ओव्हरटेक करीत असताना कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कराने मालवाहू वाहनाला धडक दिली. या अपघातात मालवाहू चारचाकी वाहन उलटून झालेल्या  अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघातातील चारचाकी कार ही सिन्नरच्या एका डॉक्टरांची असल्याचे समजते. ही कार अपघातानंतर तत्काळ  क्रेनच्या साह्याने हलविण्यात आली. तर मालवाहू चारचाकी वाहन बराच वेळ घटनस्थळी पडून असल्याने अपघातानंतर घटनास्थळी येणारे जाणारे वाहनधारकांची गर्दी झाली होती.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात