कळवण : नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातून कळवण येथे बंदोबस्तासाठी येणाºया पोलिसांच्या वाहनाला आठंबे शिवारातअपघात होऊन १६ पोलीस कर्मचारी जखमी झाले. पैकी चार पोलीस कर्मचाºयांची प्रकृती गंभीरअसल्याने त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.नववर्षाचे स्वागत व भीमा कोरेगाव प्रकरणी कळवण येथे बंदोबस्तासाठी नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातून वाहनातून (क्र. एमएच १५ एए ३०६७) चालकासह १५ कर्मचारी येत होते. आठंबे शिवारात दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास सदर वाहन उलटून झालेल्या अपघातात १६ पोलीसकर्मचारी जखमी झाले. पैकी चार पोलीस कर्मचाºयांची प्रकृती गंभीर आहे.या अपघाताची माहिती कळवण येथील गालिब मिर्झा यांनी भ्रमणध्वनीवरून अभोणा येथील पोलीस कर्मचारी बबनराव पाटोळे यांना दिली. पाटोळे यांनी सदर माहिती तत्काळ कळवणचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना दिली. पोलीस निरीक्षक मांडवकर यांनी तत्काळ उपजिल्हारु ग्णालयाशी संपर्क साधतरु ग्णवाहिका व मिळेल त्या खासगी वाहनांनी सर्व जखमींना कळवण उपजिल्हा रु ग्णालयात आणले. त्यापैकी गंभीर जखमी अमरसिंग छोटूसिंग हजारी (५६), चंद्रकांत शंकर माळी (५३), निंबाजी सोमा जगताप (५६), काशीनाथ एकनाथ पवार (४३), किशोर वामन भांगरे (४०) यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथील खासगी रु ग्णालयात हलविण्यात आले आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी उपजिल्हा रु ग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. उपजिल्हा रु ग्णालयात दाखल जखमींवर डॉ. प्रवीण बागुल, परिचारिका पी. एच. मगर, भक्ती सूर्यवंशी यांनी उपचार केले.जखमींची नावेदशरथ परशराम बोरसे (४८), भास्कर माधवराव देशमुख (४९), चैतन्य बालाजी सपकाळे (५३), दत्तू बालाजी सानप (५४), मनोहर पांडुरंग केदारे (५४), बाळू काशीनाथ लोंढे (५२), बाळासाहेब निवृत्ती शिंदे (४०), राजू कचरू वाघ (५३), रमेश सखाराम चौधरी (५४), अनिल सजन कोकाटे (५०), अनिकेत सुनिल मोरे (२६) हे कर्मचारी जखमी झाले आहेत.
आठंबे शिवारात पोलीस वाहनाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 2:16 AM
नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातून कळवण येथे बंदोबस्तासाठी येणाºया पोलिसांच्या वाहनाला आठंबे शिवारात अपघात होऊन १६ पोलीस कर्मचारी जखमी झाले. पैकी चार पोलीस कर्मचाºयांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
ठळक मुद्दे१६ जखमी : चार कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर