मेशी : देवळा तालुक्यातील मेशी येथील धोबीघाट परिसरात सोमवारी (दि.२०) दुपारी राज्यमार्ग क्र मांक २२ वरील तीव्र वळणावर टेम्पो (क्र . एमएच ४१ एयू २५०४) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटून अपघात झाला. अपघातग्रस्त टेम्पो मालेगावकडून देवळ्याला जात होता.नागरिकांनी तत्काळ १०८ क्र मांकावर संपर्क साधून जखमींना मालेगाव सामान्य रुग्णलयात दाखल केले. प्रशासनाने तातडीने दखल घेत मदतकार्य सुरू केले. या अपघाताने तीन महिन्यांपूर्वी विहिरीत पडून झालेल्या परिवहन महामंडळाची बस आणि रिक्षा या अपघाताच्या स्मृती जागृत झाल्या. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या धोकादायक वळण रस्तादुरुस्तीचे काम तातडीने करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी आहे. या तीव्र वळणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अशी मागणी दहीवड तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेश देवरे यांनी केली आहे.
मेशीजवळ धोबीघाट परिसरात टेम्पोला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:32 PM