शहरं
Join us  
Trending Stories
1
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
2
७ वर्षाचे नाते, मग लग्न, सरकारी नोकरी लागताच पत्नीचे मन बदलले; इंजिनिअरला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल
3
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावाचे स्टँड काढून टाकण्याचे आदेश
4
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
5
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
6
एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहारात १० लाखांचा गंडा, मुंबईतील कॅशियरला ठकवले
7
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
8
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
9
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
10
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
11
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
12
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
13
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
14
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
15
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
16
प्रेमाने ‘किसन’ अशी हाक मारणारे कमी झाले, पण दाराबाहेर चपला हीच श्रीमंती!
17
पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले
18
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
19
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
20
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता

येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात,6 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 11:20 IST

येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  

ठळक मुद्देएकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यूअर्टिगा आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक, कारचा चुराडाजेसीबीच्या मदतीनं अपघातग्रस्त गाड्या केल्या वेगळ्या, मृतदेह काढले बाहेर

नाशिक - येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बुधवारी (21  नोव्हेंबर) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिला, 2 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. अर्टिगा आणि आयशर या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. अर्टिगामधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. अनकाई बारी जवळील ही दुर्घटना आहे.  हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये अर्टिगा कारचा अक्षरशः चुराडा झाला. शिवाय, मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेऊन अपघातग्रस्त गाड्या वेगळ्या करण्यात आल्या. मृत्युमुखी पडलेले सर्व जण अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील रहिवासी होते.

कोपरगाव शहरातील बाबा पान स्टॉलचे मालक हे बाबा अनाड नावाने प्रसिद्ध आहेत. या दुर्घटनेत त्यांची पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि नातू  या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. इंदुर(मध्य प्रदेश) हून माघारी येत असताना हा अपघात झाला.

मृतांची नावे

बाळासाहेब मुरलीधर अनाड ( वय 60 वर्ष)इंदूबाई बाळासाहेब अनाड ( वय 55 वर्ष)श्रीनाथ बाळासाहेब अनाड ( वय 25  वर्ष)मोहिनी गणेश खांदवे (वय 35 वर्ष, तेलीखुंट,नगर)हरी गणेश खांदवे ( वय 5 वर्ष )भीमाबाई बापू रोकले ( वय 70 वर्ष)

आयशर गाडी मनमाडच्या दिशेनं जात होती, तर अर्टिगा कार ही येवल्याच्या दिशेने जात प्रवास करत होती. यादरम्यान, दोन्ही गाड्या येवला-मनमाड मार्गावर समोरासमोर धडकल्या आणि भीषण अपघात झाला. अपघाताचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक