सिडको : खुटवडनगर येथील उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू गणेश आत्माराम कोठावदे (२७, रा. साळुंखेनगर, खुटवडनगर) याचा सोलापूरजवळील उमरगा येथे झालेल्या अपघातातमृत्यू झाला तर त्याचा मित्र मुन्नीलाल (३५) हा गंभीर जखमी झालाआहे.कोठावदे हा फिटनेस फाइट क्लब या जिमचा संचालक व फिटनेस कोच म्हणून काम करीत होता. एक उत्कृष्ट शरीरसौष्ठवपटू म्हणूनही त्याची वेगळी ओळख होती. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेततो नाशिकचे प्रतिनिधित्वहीकरणार होता. त्याच्या अपघातीमृत्यूने नाशिककरांनी उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू गमावल्याचीभावना क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे.गणेश व मुन्नीलाल हे दोघेही दुचाकीने सोलापूरला गेले होते. परतीचा प्रवास करत असताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर बसव कल्याणजवळ महामार्गावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.या धडकेमुळे गणेश व मुन्नीलाल दोघेही रस्त्याच्या दुभाजकावर आदळले. यात गणेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर मुन्नीलाल गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर उमरगा येथे उपचार सुरू आहेत.विवाहाची तयारी सुरू असताना काळाची झडपगणेश हा सहकार क्षेत्रातील भास्कर कोठावदे यांचा पुतण्या असून, त्याचे वडील आत्माराम कोठावदे हे मायको कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. कुटुंबीयांकडून गणेशच्या विवाहाची तयारी सुरू करण्यात आली होती; मात्र दुर्दैवाने काळाने गणेशवर झडप घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सिडकोतील शरीरसौष्ठवपटूचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 1:53 AM
खुटवडनगर येथील उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू गणेश आत्माराम कोठावदे (२७, रा. साळुंखेनगर, खुटवडनगर) याचा सोलापूरजवळील उमरगा येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला
ठळक मुद्देहळहळ : डिसेंबरमधील राज्यस्तरीय स्पर्धेला मुकला