नाशिक : ओझरवरून काम आटोपून मुंबई-आग्रा महामार्गावरून जुने नाशिककडे परतत असताना आडगावजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील जुन्या नाशकातील दोघे युवक जागीच ठार झाले. नाईकवाडीपुरा येथील सय्यद कुटुंबीयांनी एकुलता एक मुलगा अझहरला या अपघातात गमावले तर काजीगढीवरील बागवान कुटुंबातील हाजी मलंग हा घराचा कर्ता पुरूष हरपला. या अपघाताची बातमी रात्री जुन्या नाशकात येताच संपुर्ण जुने नाशिक भागात शोककळा पसरली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, ओझरकडून शुक्रवारी (दि.२०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास नाशिककडे अॅक्टिवा दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार हाजी मलंग बागवान (४०,रा काजी गढी), अझहर इलियास सय्यद (२७,रा. नाईकवाडीपुरा) या दोघांचा मृत्यू झाला. पाठीमागून भरधाव जाणाऱ्या वाहनाने अझहर व मलंग या दोघांना चिरडले. अझहर चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मलंग यांचा उपचारादरम्यान जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने संपुर्ण जुन्या नाशकात हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपुर्वीच अझहरने अॅक्टीवा दुचाकी खरेदी केली होती. अद्यापपर्यंत दुचाकीला क्रमांकदेखील आरटीओकडून मिळालेला नाही. तत्पुर्वीच काळाने या दोघांवर घाला घातला. मलंग डोक्यावर हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवित होते व अझहर हा त्यांच्यासोबत पाठीमागे बसलेला होता असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मलंग यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक निरिक्षक संजय बिडगर हे करीत आहेत. बागवान यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक लहान मुलगी, मुलगा असा परिवार आहे.
जुन्या नाशकातील दोघांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 5:07 PM
मलंग यांनी डोक्यावर हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवित होते व अझहर हा त्यांच्यासोबत पाठीमागे बसलेला होता असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मलंग यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देकाही दिवसांपुर्वीच अझहरने अॅक्टीवा दुचाकी खरेदी केली होती. मलंग डोक्यावर हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवित होते