नाशिक : धनादेश न वटल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस़ के़ दुगावकर यांनी दिलेल्या तीन महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षेनंतर अटकेचे समन्स घेऊन पकडण्यासाठी गेलेल्या पंचवटी पोलिसांना आरोपीने खोटे नाव सांगत फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे़ अनिल दिलीप अंबरपुरे (२५, रा़ सप्तशृंगी पॅलेससमोर, भगवतीनगर, हिरावाडी, पंचवटी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, तो पेठरोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीतील जय मातादी व्हेजिटेबल कंपनीच्या संचालकांचा मुलगा आहे़ कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला व्यवसायिक रघुनाथ वामन येलमामे (रा़श्रीनाथ किराणा, बालाजी चाळ, पेठरोड) व जय माता दी व्हेजीटेबल कंपनीचे संशयित अनिल दिलीप अंबरपुरे यांचे दुकान एकमेकांना लागून आहे़ त्याच्यामध्ये पाच-सहा वर्षांपासून भाजीपाल्याचा व्यापार होत असे़ आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१३ मध्ये कोबी व फ्लॉवर, असा दोन लाखांचा शेतमाल खरेदी केला़ मात्र वारंवार मागणी करूनही अंबरपुरे हे पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते़जिल्हा न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एसक़े़दुगावकर यांनी या खटल्यात आरोपी अंबरपुरे यास तीन महिने साधा कारावास व तीन लाख रुपये नुकसानभरपाईसह अदा करण्याचे आदेश दिली़ तसेच रक्कम न भरल्यास आणखी एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली तसेच शिक्षा वॉरंट काढले़पंचवटी पोलीस हे वॉरंट घेऊन अंबरपुरे याच्या घरी जाऊन त्यास नाव विचारले असता त्याने चुकीचे नाव सांगून पलायन केले़ या घटनेमुळे पंचवटी पोलीसही अवाक् झाले असून, आरोपी अनिल अंबरपुरे याचा शोध घेत आहेत़धनादेश न वटल्याने दावाच्अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर अखेर अंबरपुरे याने आयसीआयसीआय बँकेचे २२ फेब्रुवारी २०१४ चे ३१०५२ व ३१०५३ असे प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश दिले होते़ मात्र, हे धनादेश बँकेत टाकले असता न वटता परत आल्याने येलमामे यांनी न्यायालयात दावा केला होता़
शिक्षेतील आरोपीने खोटे नाव सांगून पोलिसांच्या हातावर दिली तुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 1:51 AM