शहरं
Join us  
Trending Stories
1
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
2
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
3
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
4
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
5
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
6
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
7
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
8
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
9
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
10
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
11
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
12
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
13
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
14
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
15
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
16
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
17
आजारी पडू नका; खर्च नाही पेलणार, उपचारावर होणारा खर्च ११.३५% वाढला
18
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
19
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
20
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी

नाशिक मनपात कर्मचारी दहशतीखाली असल्याचा म्युनिसीपल कर्मचारी सेनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 2:18 PM

नाशिक : महापालिकेचे सहाय्यक अधीक्षक संजय धारणकर यांनी आत्महत्या केल्यानंतर अंतर्गत राजकारण पुन्हा तापू लागले असून म्युनिसीपल कर्मचारी सेनेने तर थेट कामाच्या अतिताणामुळेच आत्महत्या झाली असल्याचा आरोप करीत प्रशासनातील दहशतीचे वातावरण बदलावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देधारणकर आत्महत्येप्रकरणी वातावरण तापले दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

नाशिक : महापालिकेचे सहाय्यक अधीक्षक संजय धारणकर यांनी आत्महत्या केल्यानंतर अंतर्गत राजकारण पुन्हा तापू लागले असून म्युनिसीपल कर्मचारी सेनेने तर थेट कामाच्या अतिताणामुळेच आत्महत्या झाली असल्याचा आरोप करीत प्रशासनातील दहशतीचे वातावरण बदलावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सहाय्यक अधीक्षक संजय धारणकर यांनी गुरु वारी (दि.२) गळफास घेऊन आत्महत्या केली. जिल्हा रूग्णालयात त्यांच्या मृतदेहाजवळ कामाच्या अतिताणामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी आढळल्याने केल्याचे समोर आल्याने अधिकारी, कर्मचारी वर्गात प्रशासनाविषयी संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. शुक्र वारी (दि.३) सकाळी म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेच्यावतीने राजीव गांधी भवनात संजय धारणकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी महापौर रंजना भानसी, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृहनेते दिनकर पाटील, शिवसेना गटनेते विलास शिंदे, भाजपा गटनेते संभाजी मोरु स्कर, नगरसेविका हेमलता पाटील आणि तसेच कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेचे अध्यक्ष आणि नगरसेवक प्रविण तिदमे यांनी मनपा कर्मचारी दहशतीत काम करत असून त्यांच्यावरील अतिरिक्त कामाचा तणाव कमी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. संजय धारणकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाºया अधिकाºयांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेने मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिकेत अधिकारी आणि कर्मचारी संख्या अतिशय कमी असल्याने सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी वर्गावर कामाचा प्रचंड ताण येत असल्याचे म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेने वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे. मात्र, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धारणकर यांना जीव गमवावा लागला. सतत निलंबन, बडतर्फ यासारख्या कारवाईची भीती अधिकारी आणि कर्मचारी वर्गात निर्माण केली जात आहे.

कामाचा अतिरिक्त ताण वाढल्यानेच आत्महत्येसारखी पावले उचलली जात आहे. अधिकारी आणि कर्मचारी वर्गावर असलेला कामाचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी कामाचे सुयोग्य नियोजन व्हावे, प्रशासनाने तातडीने नोकर भरती करण्यासाठी पावले उचलावी अश्या प्रमुख मागण्या म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेने मनपा आयुक्तांकडे केल्या आहेत. अधिकारी, कर्मचाºयांवर दबाव आणल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने निवेदनात दिला आहे..........पोलीसांनाही निवेदनकामगार सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रविण तिदमे यांनी गंगापूररोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांना निवेदन देऊन धारणकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्या अधिकार्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, त्यांच्या मृत्यूपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीची प्रत मिळावी अशी मागणी केली आहे. कामाचा अतिरिक्त ताण असल्यास अथवा वरिष्ठ अधिकारी दबाब आणत असल्यास मनपा अधिकारी, कर्मचार्यांनी टोकाचे पाऊल न उचलता कामगार सेनेशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रविण तिदमे यांनी केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका