लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील येवला-मनमाड महामार्गावर शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.तालुक्यातील अनकाई फाट्याजवळ मंगळवारी (दि.१४)येवला- मनमाड रोडवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला दोन अनोळखी इसमांनी दुचाकीने त्याच्याजवळ येऊन कुºहाडीचा धाक दाखवून रोख रक्कमेसह मोबाईल फोन जबरीने हिसकावून नेला होता. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा लूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधाराने शहरातून आकाश संजय गायकवाड (२१), रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर या संशयीतास ताब्यात घेतले होते. त्याने साथीदार मनोज गोरख मांजरे, रा. मतापूर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. अधिक तपासात आरोपींकडून सदर गुन्ह्यातील जबरीने हिसकावून नेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मनमाड उपविभागीय पोलिस अधिकारी समरसिंग साळवे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांचे नेतृत्वाखाली रावसाहेब कांबळे, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, शांताराम घुगे, विशाल आव्हाड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपीस ताब्यात घेतले आहे.दरम्यान, सदर आरोपींवर यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून संशयीत आरोपी मनोज मांजरे हा तोपखाना पोलीस स्टेशन जि. अहमदनगर येथे चोरीच्या गुन्ह्यात अटक आहे.
येवला-मनमाड रोडवर लूटमार करणारा आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 2:44 PM
येवला : तालुक्यातील येवला-मनमाड महामार्गावर शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई