शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

सावरगाव गणात प्रतिष्ठा पणाला

By admin | Published: February 12, 2017 12:08 AM

चुरस : गण महिला राखीव झाल्याने हिरमोड

सागर रायजादे  येवलाजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यात शिवसेनेने उभ्या केलेल्या कडव्या आव्हानाने राष्ट्रवादी कॉँग्रेसला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागत आहे. आरक्षण जाहीर झाल्यापासून त्यात सावरगाव गण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव झाल्याने पुरु ष नेत्यांचा हिरमोड झाला असला तरी त्यांच्या सौभाग्यवतींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून येवला पंचायत समितीच्या सभापतिपदावर कसे बसवता येईल यासाठी आटापिटा सुरु आहे. येवला पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव निघाल्याने या गणातील निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आजी-माजी यासह सर्वांचेच अस्तित्व पणाला लागणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने गणासाठी याच समीकरणाचा विचार करून सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या नगरसूल गावाचा विचार करून दोन्ही उमेदवार याच गावात देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून होत आहे. हा गट पूर्वाश्रमीचा कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, सेना-भाजप युती अशा वेगवेगळ्या पक्षांच्या प्राबल्याखाली होता. यापूर्वी या गणाचा समावेश पाटोदा गटात होता. गट-गणाच्या निर्मितीत सावरगाव गणातील काही गावांचा समावेश दुसऱ्या गणात करण्यात आला. असे असले तरी शिवसेनेचे नेते संभाजीराजे पवार यांचा या गट व गणावर मोठी पकड आहे. याचे उदाहरण द्यायचेच झाले तर त्यांनी पंचायत समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार छगन भुजबळ यांच्या उपस्थितीतदेखील राष्ट्रवादीला सामोरे जावे लागले आहे. यावेळी शिवसेनेच्या वतीने दिलीप मेंगळ विजयी झाले होते हा इतिहास आहे. या गणात डॉ. सुधीर जाधव यांना उमेदवारी करण्याची इच्छा असताना त्यांची उमेदवारी डावलली गेली. परंतु विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन नरेंद्र दराडे व डॉ. सुधीर जाधव यांची नाराजी दूर करतील असे बोलले जाते. संभाजीराजे पवार व नरेंद्र दराडे यांच्यापुढे बंडाळी टाळण्याचे आव्हान आहे.