नाशिक : बांधकाम पूर्ण करूनही पूर्णत्वाचा दाखला न दिलेल्या सुमारे पन्नास हजार मिळकती महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळल्यानंतर प्रशासनाने त्यावर नोटिसांची कारवाई सुरू केली. त्यावर सुनावणी सुरू आहे; परंतु याच दरम्यान अनेक इमारतींना पूर्णत्वाचे दाखले मिळाल्याने जुने आक्षेपित दर आणि सुधारित दर याचा मेळ घालताना प्रशासनाची दमछाक होत आहे.महापालिकेच्या वतीने एका खासगी एजन्सीमार्फत मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात आले. ते करताना सुमारे ५९ हजार मिळकतींकडे पूर्णत्वाचा दाखला नसल्याचे आढळले. या मिळकतींना गेल्यावर्षीचे सुधारित दर लागू करण्यात आल्याने घरपट्टी कैकपटीने वाढणार होती. महापालिकेच्या महासभेत यावरून अनेकवेळा वादळी चर्चा झाली.
पूर्णत्वाचा दाखला मिळाल्याने वाढला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:53 AM