शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

स्वतंत्र सातपूर सिडको महापालिका उभारून या भागास नववैभव प्राप्त करून

By admin | Published: December 07, 2014 1:56 AM

स्वतंत्र सातपूर सिडको महापालिका उभारून या भागास नववैभव प्राप्त करू

नाशिक : महापालिकेस शहराच्या इतर भागांच्या तुलनेत सातपूर, अबंड, सिडको या भागांतून तब्बल ७० टक्के निधी प्राप्त होत असतानाही हा भाग नेहमीच दुर्लक्षिला गेला आहे. स्वतंत्र सातपूर सिडको महापालिका उभारून या भागास नववैभव प्राप्त करून देण्यासंदर्भात सर्वपक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित नेतेमंडळींकडून व्यक्त करण्यात आले. त्याकरिता कृती समिती स्थापन करून सदरचा प्रस्ताव शासन दरबारी मांडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सातपूर येथील एका हॉलमध्ये नगरसेवक दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र सातपूर-सिडको महापालिका स्थापन करण्याची दिशा ठरविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होते. यात अण्णा पाटील, माजी महापौर प्रकाश मते, माकपचे डॉ. डी. एल कराड, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, सभागृह नेता शशिकांत जाधव, नगरसेवक तानाजी जायभावे, सविता काळे, उषा शेळके, उषा बेडकोळी, उद्योजक धनंजय बेळे, भगवान आरोटे, सुधाकर जाधव, दिलीप गिरासे, शंकर पाटील, सोपान शहाणे, रमेश सांळुके, प्रकाश तांबट, दिलीप निगळ आदि उपस्थित होते. १९८२ मध्ये स्थापन झालेल्या नाशिक महापालिकेत सातपूर, अंबड, पिंपळगाव बहुला, चुंचाळे, मोरवाडी, आनंदवल्ली, सिडको आदि भाग समाविष्ट झाला. सातपूर, अंबड या औद्योगिक वसाहतीचा समावेश झाल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात कर रूपाने तब्बल ७० टक्के भर पडली. असे असतानाही १९८२ ते ९२ ही प्रशासकीय राजवट व १९९२ ते २०१४ या ३२ वर्षांच्या सातपूर-सिडकोच्या वाट्याला काहीही आले नाही. रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधांकरिता आजही या भागांमध्ये लढा द्यावा लागतो. सातपूर-सिडको भागातून महापालिकेला ३४ नगरसेवक दिले जातात. मात्र ऐवढी ताकद असतानाही एकही प्रकल्प आणला जात नसल्याची खंत सर्वच उपस्थित नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली. काही मोजके राजकीय नेते वगळता एकाही नेत्याला सातपूर-सिडकोचे शहरासाठी नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली नाही. खासदारकी-आमदारकी तर एकदाही लाभली नसल्याने या भागावर नेहमीच अन्याय होत आला आहे. त्यामुळे स्वतंत्र महानगरपालिका व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण विसरून यामागणीचा पाठपुरावा करण्याची गरज असल्याचाही ठराव यावेळी समंत करण्यात आला. डॉ. डी. एल. कराड यांनी स्वतंत्र सातपूर-सिडको महापालिकेची मागणी करताना राजकारण बाजूला सारून कृती समिती स्थापन करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांनी यास दुजोरा देत कृती समितीच्या निर्णयाला समर्थन दिले. (प्रतिनिधी)