सिन्नर : केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालयाकडून सिन्नर - शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण व चौपदरीकरणाचे काम सुमारे ६० ते ७० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित जागेच्या संपादनासाठी मंत्रालयाने प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासंदर्भात अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून सिन्नर - शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण, चौपदरीकरणाचे काम बायपाससहीत सुरू आहे. सिन्नर ते सावळीविहीर फाट्यापर्यंत सुमारे ६० किलोमीटर महामार्गाचे काम करण्यात येत आहे. त्यातील सुमारे ६० ते ७० टक्के काम पूर्णत्वास गेले आहे. दरम्यान, महामार्गाच्या चौपदरीकरण व रुंदीकरणासाठी लागणाऱ्या जागेचे संपादन करण्यात आले असता, काही गट, जागा सुटल्या होत्या. काही जागांबाबत वाद सुरू होते तर काही जागामालक अपिलात गेले होते. याबाबत आता सक्षम प्राधिकारी यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे आक्षेप प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे रस्ते वाहतूक मंत्रालयाने उर्वरित जागांच्या संपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. सिन्नर - शिर्डी मार्गावरील मिरगाव, मुसळगाव, वावी या भागातील सुमारे १.०१८० हेक्टर क्षेत्र संपादित करण्यासाठी मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. यामधील बरीचशी जागा कोरडवाहू व बिनशेती प्रकारची आहे. मंत्रालयाकडून आता अधिसूचना जारी झाल्याने जमीन संपादनाला वेग येणार असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण होऊन राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची अपेक्षा वाढली आहे.
सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या उर्वरित जागेचेही संपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2022 12:18 AM
सिन्नर : केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालयाकडून सिन्नर - शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण व चौपदरीकरणाचे काम सुमारे ६० ...
ठळक मुद्देरस्ते वाहतूक मंत्रालय : अधिसूचना जारी