नाशिक : बेशिस्त वाहनधारक व वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरले असून, बुधवारी (दि़ २२) त्र्यंबक नाका सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग वाहने उभे करणारे, सिग्नल तोडणारे अशा ११० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून २२ हजार रुपयांचा दंड वसूल केला़ सकाळी अकरा ते दुपारी दीड या कालावधीत वाहतूक शाखेतर्फे ही मोहीम राबविण्यात आली़पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शहरातील वाढते अपघात व बेशिस्त वाहतुकीला चाप बसावा यासाठी कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत़ त्यानुसार शहरातील सिग्नलही वाहनधारक पाळत नसल्याचे समोर आल्यानंतर सर्वप्रथम सिग्नलच्या ठिकाणी लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे़ शहरात व्यापक मोहिम राबविण्यात येऊन कारवाई करण्यात आली. मुळात अपघात व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिग्नल बसविले जातात़ मात्र, नियमांचे पालन करण्याऐवजी ते मोडण्याकडेच वाहनधारकांचा कल दिसून आल्याचे कारवाईवरून समोर आले़ सिग्नलच्या ठिकाणी असलेले झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे हे पादचाऱ्यांसाठी असतात, तसेच झेब्रा क्रॉसिंगच्या मागे असलेल्या रेषेच्या मागे वाहनधारकांनी वाहने उभी करणे अपेक्षित असते़; मात्र शहरात सर्रास झेब्रा कॉसिंगच्या पुढे वाहनधारकांकडून वाहने उभी केली जातात़ तर काही वाहनधारक सिग्नल यंत्रणेला न जुमानता सिग्नल तोडतात़ सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांवर २०० रुपये दंड आकारला जातो़ विशेष म्हणजे पोलिसांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसवरदेखील कारवाई केली़ (प्रतिनिधी)
११० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
By admin | Published: March 23, 2017 12:53 AM