चांदवड : येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मोटारसायकल व चारचाकी वाहनधारकांवर चांदवड पोलिसांनी कारवाई केली, तर १२ वाहन-धारकांकडून दोन हजार रुपये दंड वसूल केला.चांदवड तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात अनेक दुचाकीस्वार तीन सिट बसवणे, लायसन्स नसणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे या कारणांवरून वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी मुज्जमील देशमुख, योगेश हेंबाडे यांनी मोटारसायकल व चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करत दोन हजारांचा दंड वसूल केला. नागरिकांनी व वाहनधारकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार प्रदीप पाटील, नगर परिषदेच्या वतीने मुख्य अधिकारी अभिजित कदम, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी केले आहे.
चांदवड शहरात बारा वाहनधारकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 9:14 PM