शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

सराईत गुन्हेगार, झोपडपट्टी दादांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 1:59 AM

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, २७ सप्टेंबरपासून निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर-ग्रामीण पोलीस दल सज्ज झाले असून, शहरात कायदासुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांसह झोपडपट्टी दादादेखील पोलिसांच्या ‘रडार’वर आहेत.

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : शहर पोलीस सज्ज; ९३ गुन्हेगार तडीपार

नाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, २७ सप्टेंबरपासून निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर-ग्रामीण पोलीस दल सज्ज झाले असून, शहरात कायदासुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांसह झोपडपट्टी दादादेखील पोलिसांच्या ‘रडार’वर आहेत. अद्याप ९३ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, १०३ गुन्हेगारांचा तडीपारीच्या प्रस्तावाची चौकशी सुरू आहे.शहर पोलीस प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जात आहे. शहरात कोठेही कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्थेला धोका निर्माण करणार नाही, यासाठी दक्षता घेतली जात आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सर्व उपआयुक्त, सहायक आयुक्तांशी चर्चा करून पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सतर्कतेच्या सूचना देण्याचे आदेश दिले आहे. विविध पोलीस ठाण्यांच्या बेकायदेशीर जुगार अड्डे, दारू विक्रीचे अड्डे शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एमपीडीए कायद्यान्वये नऊ संशयितांवर कारवार्ई करण्यात आली आहे.शहरात यापूर्वी ज्या मतदान केंद्रांवर अनुचित घटना घडल्या आहेत, ती केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचे विशेष लक्ष असून, संबंधित पोलीस ठाण्यांना त्या केंद्रांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाच स्ट्रॉँगरूम तयार करण्यात येणार असून, या स्ट्रॉँगरूमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात राहणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत १२, तर विधानसभा निवडणुकीच्या काळात शहरात आठ गुन्हे दाखल झाले होते.सोशल मीडियावर ‘सायबर’चा वॉचनिवडणूक काळात कुठल्याहीप्रकारे शहरातील वातावरण खराब होणार नाही व कोणतेही द्वेष पसरणार नाही, याकरिता सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी सायबर व विशेष शाखेच्या पोलिसांना विविध सूचना दिल्या गेल्या असून, त्यांचा शहरातील विविध ‘व्हॉट््स अ‍ॅप ग्रुप’, फेसबूक पेज, फेसबुक वॉलवर लक्ष राहणार आहे. कुठल्याहीप्रकारचा आक्षेपार्ह मजकुराची देवाण-घेवाण होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी