येवला : तालुक्यात अवैध दारू विक्री सुरूच असल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी एका पोलिस निरीक्षकासह आठ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ासह पोलिस नाईक यांना निलंबित करण्यात आले असून अन्य सहा जणांची बदली करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी धाड टाकून अवैध दारूसाठा जप्त केला असून येवला तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हयामध्ये अवैध व्यवसाय चालणार नाहीत, असे आढळून आल्यास संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई करण्यात येईल असे आदेश सर्व अधिकाºयांना देण्यात आले होते. सदर आदेश गांभिर्याने न घेता, अवैध दारू विक्र ी चालूच ठेवल्याबद्दल येवला तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना नियंत्रण कक्ष येथे संलग्न करण्यात आलेले आहे. तसेच संबंधित बीटचे अंमलदार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कैलास जाधव व पोलिस नाईक योगेश पाटोळे यांना निलंबित करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी त्यांच्या बीटमधील अवैध धंदयांवर कारवाई न केल्याने सदर बीटमधील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार शांताराम घुगे, पोलिस नाईक रावसाहेब कांबळे, पोलिस शिपाई प्रविण काकड, पोलिस शिपाई भाउसाहेब टिळे, पोलिस शिपाई विशाल आव्हाड यांनाही स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण येथून बदली करून नियंत्रण कक्ष, नाशिक ग्रामीण येथे संलग्न करण्यात आले आहे.शेतकºयाने मांडली होती व्यथायेवला तालुक्यातील एक शेतकरी व त्यांच्या पत्नीने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना फोन करून त्यांचा मुलगा दारूच्या व्यसनात अडकल्याची आणि त्यामुळे जीवन जगणे अवघड होऊन बसल्याची व्यथा कानावर घातली. याचबरोबर येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीत एके ठिकाणी अवैधरित्या दारूची विक्र ी होत असल्याचेही सांगितले. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी त्वरीत तेथे पथक पाठवून धाड टाकली व अवैध दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.