पंचवटी : राज्यात कोरोना संसर्ग वाढत चालल्याने जिल्हा प्रशासनाने नाशिक शहरात शनिवारी आणि रविवारी संपूर्ण दिवस जीवनावश्यक वस्तू दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार शनिवारी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद पंचवटीत मिळाला. मात्र रविवारच्या दिवशी बहुतांशी दुकाने नियमितपणे सुरू असल्याचे दिसून आले. महापालिका पंचवटी विभागाच्या वतीने दोन दुकानचालकांवर
कारवाई करण्यात आली तर काही दुकानदारांना समज देण्यात आली.
जीवनावश्यक श्रेणीत नसतांनाही दुकाने सुरू ठेऊन
उल्लंघन केले म्हणून पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या पथकातील भूषण देशमुख, किरण मारू यांनी इलेक्ट्रॉनिक व एका हार्डवेअर दुकानदारांना दंड केला आहे. पंचवटी परिसरात रविवारी गारमेंटस, इलेक्ट्रॉनिक, मोबाईल रेपरिंग, गॅरेंज, हार्डवेअर तसेच अन्य आस्थापना उघडपणे सुरू होत्या. प्रशासनाने आदेशित करूनही रविवारी काही व्यावसायिकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.