भगुर : शासकीय आदेशानुसार भगूर शहरातील बिनापरवाना बेकायदेशीर अनाधिकृत बॅनर्स, फलक, काढण्याची मोहीम भगुर नगर पालिकेने हाती घेवून फलक जप्तीची कारवाई कर ण्यात आली तसेच अनधिकृत फलक लावणाऱ्यांना प्रारंभी समज देण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांनी दिली आहेपालिकेचे मुख्यलिपिक रमेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली सफाई व इतर कामगारांनी शिवाजी चौकात लावलेले अनाधिकृत राजकीय पक्षांचे काही बॅनर्स काढून घेण्याची समज संबंधिकांना दिली. नगरपालिकेच्या जिजामाता व्यापारी संकुल या शासकीय इमारती वरील राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स, तसेच निधन वार्ता फलक, जाहिरात फलक त्वरित काढून घेण्याचे आदेश मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांनी दिले. त्यानंतर अनेकांनी तात्काळ काढून घेतले. नगर पालिका हद्दीत बेकायदेशीर बँनर्स लावण्यास न्यायालयाने मनाई केलेली असतानाही भगुर शहरात विनापरवाना बेकायदेशीर अनेक फलक लागलेली आहेत. यापुढे भगुर नगर पालिकेची परवानगी न घेता कोणीही बेकायदेशीर बँनर्स, जहिरात फलक लावतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
भगुरला अनधिकृत फलकाविरूद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 2:48 PM