अभोणा : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या अभोणा शहरात पोलीसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला सुरु वात केली आहे विनामास्क फिरणाºयांवर प्रशासन कारवाई करीत असताना दुसरीकडे मात्र काही कोरोनाबाधित शहरात मुक्तपणे फिरत असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या प्राथमिक नियमांनाच हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे.शहरात बाधित रूग्णसंख्या वाढती असून आता पर्यंत काही जणांचा दुर्देवी अंत झाला आहे. जे बाधित रु ग्ण घरातच विलिगकरणात राहात आहेत त्यातील काहीजण सरकारने घालून दिलेल्या नियमांनाच केराची टोपली दाखवत असल्याने कोरोनावर काम करणाºया यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. कोरोना पासून बचाव करण्यासाठी शासनाने सामाजिक अंतर आणि मास्कचा नियमित वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अभोणा पोलीसांनी शहरात बाजाराच्य निमित्ताने विनाकारण व विनामास्क फिरणाºयांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना समज देण्यात आली तर मोटारवाहन कायद्याचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करत ४८ हजार रु पये दंड वसूल करण्यात आला.नागरिकांना आवाहनपोलीसांच्या वतीने यापुढेसुध्दा विनामास्क फिरणाºया नागरिकांवर कारवाई सुरूच राहणार आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. पोलिसांसह आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.