नाशिक : नाशिक तहसील कार्यालयातील पुरवठा खात्यातील अनागोंदी कारभाराबद्दल कर्मचारी निलंबित करण्याची कार्यवाही केली असली तरी, या साऱ्या प्रकरणात दोषी अधिकाºयांवर काय कारवाई केली तसेच आधार सिडिंगचे काम करणाºया ठेकेदाराला काम पूर्ण न करताच देयके कशी अदा केली आदी पुरवठा खात्याशी निगडित प्रश्न राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे पुरवठा खाते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नाशिक तहसील कार्यालयातील पुरवठा खात्याबाबत केल्या जाणाºया तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी पुरवठा खात्याची दप्तर तपासणी केली असता त्यात अनेक गंभीर स्वरूपाच्या चुका निदर्शनास आल्या होत्या व त्यावरून पुरवठा अव्वल कारकुनाला निलंबित करण्यात आले आहे. कारवाईचा धागा पकडत आमदार सीमा हिरे यांनी यासंदर्भात अधिवेशनात प्रश्न विचारला आहे. पुरवठा खात्याच्या अनागोंदी कारभाराबद्दल कर्मचाºयांवर कारवाई करण्यात आली असेल तर अधिकाºयांवर काय कारवाई केली, अशी विचारणा करण्यात आली आहे. याशिवाय पुरवठा विभागाने आधार सिडिंगची कामे दिलेल्या ठेकेदाराने काम पूर्ण केलेले नसताना त्याला देयके कशी अदा केली, आधार सिडिंगसाठी रेशन दुकानदारांकडून वेळोवेळी पैसे घेण्यात आलेले असतानाही काम पूर्ण का होऊ शकले नाही, अशी विचारणा करण्यात आली आहे. पॉस यंत्राबाबत रेशन दुकानदारांच्या असलेल्या तक्रारींबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. नाशिक शहर धान्य वितरण अधिकाºयांच्या मनमानी कारभाराबाबतदेखील रेशन दुकानदारांच्या असलेल्या तक्रारींवर काय कार्यवाही करण्यात आली, अशी विचारणा करण्यात आली आहे. विधिमंडळ अधिवेशनातच थेट पुरवठा खात्याच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने पुरवठा खाते चर्चेत आले आहे.
पुरवठा खात्याची कारवाई विधिमंडळात चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:32 AM