कळवण येथे हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वाराचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करताना डॉ. संजप दराडे. समवेत सुधाकर मांडवकर, भूषण देशमुख, मधुकर तारू, रायसिंग जाधव आदी.
कळवण : ग्रामीण भागात रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे असून, हेल्मेटचा वापरच होत नसल्याने हा आकडा दरवर्षी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. संजय दराडे यांनी जिल्ह्याच्या सर्वच भागात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली असून, पोलीस अधीक्षक डॉ. संजय दराडे यांनी आज कळवण पोलीस स्टेशनच्या मोहिमेत कोल्हापूर फाटा येथे सहभागी होऊन हेल्मेटचा वापर करणाºया मोटारसायकल चालकाचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.आज कळवण शहर व तालुक्यात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर व मोटार वाहन नियमांचे उल्लंघन विषयक कारवाई करण्यात आली असून, या कारवाईत ७९ वाहनचालकांना २३,६०० रुपये दंड करण्यात आला आहे. कळवण पोलीस स्टेशन अंतर्गत ४७ केसेस करून १४,८०० रुपये तर अभोणा पोलीस स्टेशन अंतर्गत ३२ केसेस करून ८,८०० रुपये दंड करण्यात आला.कळवण तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील दळणवळणाची सुविधा सध्या अवघड झाली असून, सर्वच भागात रस्त्यांचे जाळे पसरले आहे. दरवर्षी वाहनांची संख्याही वाढते आहे.मोटारसायकल अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असून, हेल्मेटचा वापर होत नसल्याने हा दुचाकीस्वार बळींचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. संजय दराडे यांनी हेल्मेटच्या वापराकडे दुर्लक्ष करणाºया वाहनचालकांवर लक्ष केंद्रित केले असल्याने कळवण तालुक्यात कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर व अभोणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी पोलीस स्टेशन हद्दीत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मोहिमेबाबत पोलिसांनी तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृतीही करून नागरिकांच्या शंकांचे निरसन केले असल्याने मोहीम प्रभावीपणे यशस्वी करण्यात येणार आहे. हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्यात आली असून, यासाठी गावागावांत जनजागृती बाबतचे फलक लावण्यात आले आहेत.१ फेब्रुवारीपासूनहेल्मेट वापरण्यासंदर्भात जिल्ह्यात पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.हेल्मेट न घातल्यामुळे होणाºया दुर्घटना, अपंगत्व व त्यावरील उपचारांसाठी लागणारा लाखो रु पयांचा खर्च लक्षात घेता प्रत्येक दुचाकीस्वाराने व मागे बसणाºया व्यक्तीने हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे.याकडे दुर्लक्ष करणाºयांवर पोलीस कारवाई करतील.- डॉ. संजय दराडे,जिल्हा पोलीस अधीक्षक