नाशिकरोड : मनपाअतिक्रमण विरोधी पथकाने बिटको चौक ते जेलरोड दसकपर्यंत पथदीपावर परवानगी न घेता लावलेले १५० झेंडे जप्त करण्यात आले. मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी बिटको चौकापासून जेलरोड दसक पुलापर्यंत पथदीप व इतर ठिकाणी परवानगी न घेता लावलेले सुमारे १५० झेंडे काढून घेत जप्त करण्यात आले. त्यानंतर सिन्नरफाटा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयासमोरील मनपाच्या आरक्षित जागेवर असलेल्या ४० ते ५० अनधिकृत घरधारकांना आपली अतिक्रमित घरे काढून घेण्यासाठी एक दिवसाची मुदत देण्यात आली. तसेच देवळालीगाव सुन्ना वाडा येथे मनपा उद्यानाच्या आरक्षित जागेवर असलेले विटा-मातीची पत्र्याची अनधिकृत असलेली घरे काढून घेण्याबाबत एक दिवसाची मुदत देण्यात आली. चेहेडी गाव येथील भिल्ल आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवर असलेली कच्ची-पक्की पत्र्याची पाच-सहा घरे जमीनदोस्त करण्यात आली. बुधवारपासून नाशिकरोडच्या विविध भागात पथदीप व इतर ठिकाणी परवानगी न घेता लावलेले झेंडे, फलक काढण्याची मोहीम राबविणार असल्याचे मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांनी सांगितले.
कारवाई : बिटको ते जेलरोड मार्गावरील अनधिकृत ध्वज काढले अतिक्रमण निर्मूलन मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 12:37 AM
नाशिकरोड : मनपाअतिक्रमण विरोधी पथकाने बिटको चौक ते जेलरोड दसकपर्यंत पथदीपावर परवानगी न घेता लावलेले १५० झेंडे जप्त करण्यात आले.
ठळक मुद्देअतिक्रमित घरे काढून घेण्यासाठी एक दिवसाची मुदतपाच-सहा घरे जमीनदोस्त करण्यात आली