गंगापूररोड : सावरकरनगर येथील काही मंगल कार्यालये आणि लॉन्सचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार शनिवारी (दि.१३) वॉक विथ कमिशनर उपक्रमांतर्गत आयुक्तांकडे करण्यात आली. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदरच्या लॉन्सची तपासणी करून प्रसंगी ते बंद करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर अंतर्गत शनिवारी (दि.१३) गंगापूररोड येथे झालेल्या कार्यक्रमात सुमारे ३९ नागरिकांनी टोकन घेऊन विविध तक्रारी केल्या. यात प्रामुख्याने अतिक्रमण, अस्वच्छता अशा तक्रारींचा समावेश होता. तक्रारींचे निराकरण करण्याचे आदेश आयुक्त मुंढे यांनी यावेळी दिले. गंगापूररोडवर काही हॉटेल व्यावसायिकांसंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्र ारी आल्या असून पार्किंगच्या जागेत अतिक्र मण करून व्यवसाय सुरू केल्याने त्याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. तर जेहान सर्कल परिसरात एक हॉटेल व्यावसायिक अनधिकृत जागेत व्यवसाय करत असल्याचे एका नागरिकाने तक्र ारीत म्हटले असून त्यावर ही बाब तपासून दोषी आढळल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले आहेत. वारंवार सांगूनही हॉटेल व्यावसायिक ऐकत नसतील तर त्यांचे लायसन्स रद्द करण्याचा त्यांना दिला आहे.शहराची गरज लक्षात घेऊन महापालिका शहर बस वाहूतक सुरू करणार असून, येत्या सहा महिन्यांत चार डेपोंचे नियोजन करण्यात येणार असून, त्या माध्यमातून चारशे बसेस धावणार असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. नागरिकांशी संवाद साधताना प्रमोदनगरमध्ये डबकी साचल्याच्या तक्र ारीवर संबंधित अधिकाऱ्याला मुंडे यांनी चांगलेच धारेवर धरले. आॅनलाइन तक्र ार करूनही नागरिकांच्या तक्र ारी सुटत नसल्याचे लक्षात येताच संबंधित अधिकाºयाची खरडपट्टी काढत तत्काळ तक्रार निवारण करण्याच्या सूचना केल्या. रस्ते, वीज, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, पथदीप, अतिक्र मण, हॉटेल, शाळा-महाविद्यालयांचे पार्किंग भाजीबाजारातील समस्या, उद्यान दुरु स्ती, अनधिकृत लॉन्स व तेथील कार्यक्र मांतून होणारे ध्वनिप्रदूषण, परिसरातील भटक्या कुत्र्यांची समस्या, नालेसफाई आदी विषयांच्या तक्र ारी यावेळी पश्चिम विभागातील नागरिकांनी आयुक्तांसमोर मांडल्या. यावेळी आयुक्त मुंढे यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त किशोर बोरडे, विभागीय अधिकारी नितीन नेर, बांधकाम विभागाचे प्रशांत बोरसे, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नीलेश साळी, अतिक्र मण विभागाचे उपायुक्त बहिरम, अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी एस. के. बैरागी, केंद्र प्रमुख सी. एन. भोळे उपस्थित होते.अन्य शहरांच्या तुलनेत करवाढ कमीचशहरात करवाढ केल्यानंतरही महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकांच्या तुलनेत सर्वात कमी कर नाशिक महानगरपालिकेत असल्याचा दावा आयुक्तांनी केल्याचे सांगत, सर्व काही महापालिका किंवा शासन करेल या मानसिकतेतून अजूनही नाशिककर बाहेर आलेले नसून सरकार सगळे करणार ही अपेक्षा अगोदर डोक्यातून काढून टाका, असा सल्ला देत सिविक सेन्स बाळगून नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नाशिककरांना केले आहे.शहरातील सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या अडचणी सोडविण्यासाठी शहरात नव्याने अद्ययावत ११२ सार्वजनिक ई-टॉयलेट सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय सुमारे सहाशे शौचालयांची सोय करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सावरकरनगर येथील बेकायदा लॉन्सवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:59 AM
सावरकरनगर येथील काही मंगल कार्यालये आणि लॉन्सचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार शनिवारी (दि.१३) वॉक विथ कमिशनर उपक्रमांतर्गत आयुक्तांकडे करण्यात आली. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदरच्या लॉन्सची तपासणी करून प्रसंगी ते बंद करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
ठळक मुद्देतुकाराम मुंढे यांचे आदेश : हॉटेल्स व्यावसायिक रडावर