शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पालिकेकडून कारवाई :  ‘हॉटेल किनारा’ जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 12:13 AM

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मुंबई नाक्यावरील अनधिकृतपणे उभारण्यात आलेले हॉटेल किनारा जमीनदोस्त करण्याची कारवाई बुधवारी (दि. ४) सकाळी केली. नजराणा न भरलेल्या आणि येणे नसलेल्या जागेवर विनापरवाना बांधकाम उभे करण्यात आल्याने पालिकेमार्फत सदर कारवाई करण्यात आल्याची माहिती नगररचना विभागाच्या सूत्रांनी दिली.

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मुंबई नाक्यावरील अनधिकृतपणे उभारण्यात आलेले हॉटेल किनारा जमीनदोस्त करण्याची कारवाई बुधवारी (दि. ४) सकाळी केली. नजराणा न भरलेल्या आणि येणे नसलेल्या जागेवर विनापरवाना बांधकाम उभे करण्यात आल्याने पालिकेमार्फत सदर कारवाई करण्यात आल्याची माहिती नगररचना विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, राजकीय वरदहस्त लाभल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या बांधकामाला अभय मिळत होते. परंतु, महापालिका आयुक्तांनी याबाबत कठोर पावले उचलण्याचे आदेशित केल्यानंतर सदर अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आले.  महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक सकाळी १० वाजेच्या सुमारास मुंबई नाक्यावर येऊन धडकले. हॉटेल किनाराचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठीच हा फौजफाटा आल्याची खबर हॉटेलचालक-मालकांना लागल्यानंतर त्यांनी विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणत्याही स्थितीत अनधिकृत बांधकाम हटविण्याचा निर्धार सोनवणे यांनी केला. त्यामुळे नाइलाज झालेल्या हॉटेलचालकाने स्वत:हून हॉटेलमधील साहित्य हलविण्यास सुरुवात केली. बांधकाम विभागाकडून जेसीबी येऊन पोहोचल्यानंतर अतिक्रमणविरोधी पथकाने अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात केली. यावेळी पत्र्याच्या शेडसह पक्के बांधकाम हटविण्यात आले. सदर हॉटेल हे प्रताप पांडुरंग गायकवाड यांच्या मालकीचे असून, ते सुरेश शेट्टी यांना चालविण्यास देण्यात आले होते. दरम्यान, नगररचना विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर जागेचा ले-आउट झालेला नाही. ती जागा पीस आॅफ लॅण्ड या स्वरूपातील आहे. सदर जागेचा नजराणा भरलेला नाही. त्यातच जागेवर विनापरवानगी बांधकाम करत व्यावसायिक कारणासाठी जागेचा वापर केला जात असल्याने ते अनधिकृत ठरविण्यात आले. त्यामुळे कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सदर कारवाईप्रसंगी विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण स्वत: ठाण मांडून होते.चर्चा अन् शेलारांचा इन्कारसदर हॉटेलमध्ये राष्टÑवादीचे नगरसेवक गजानन शेलार यांची भागीदारी असल्याची आणि गेल्या महासभेत शेलारांनी केलेल्या भाषणामुळे अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली गेल्याची चर्चा शहरात पसरली होती. याबाबत गजानन शेलार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर हॉटेलचा आणि जागेचा आपला काही संबंध नसल्याचे सांगितले. त्यापाठीमागे आपली स्वत:ची जागा असून, हॉटेलवरील कारवाई चुकीच्या पद्धतीने झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, जागामालक प्रताप गायकवाड यांनी सूचना न देता झालेल्या कारवाईबद्दल खेद व्यक्त करत, या कारवाईत नगरसेवक गजानन शेलार यांचाच हात असल्याचा आरोप केला आहे. नगरसेवकाच्या दबावाखाली येऊन सदर कारवाई झाल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका