नाशिक : बाजार समित्यांचे पदसिद्ध संचालक म्हणून सहाय्यक निबंधकांनी बाजार समित्यांच्या मासिक बैठकांना उपस्थित राहणे बंधनकारक असले तरी, अनेक बैठकांना सहाय्यक निबंधक गैरहजर राहात असल्याने त्यांनी बैठकांना हजर राहिलेच पाहिजे, अन्यथा बाजार समितीने चुकीचे ठराव अथवा गैरकाम केल्यास सहाय्यक निबंधकांनाच जबाबदार धरण्यात येईल असा इशारा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला.नाशिक जिल्ह्यातील सहकार निबंधकांच्या कामकाजाचा आढावा घेताना देशमुख बोलत होते.जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या मासिक बैठका व त्यास संचालक म्हणून सहाय्यक निबंधकांची उपस्थितीचा देशमुख यांनी आढावी घेतला यावेळी बाजार समित्यांच्या बैठकांना सहाय्यक निबंधक हजर राहात नसल्याचे निदर्शनास आले. चांदवड, मालेगाव, सिन्नर, देवळा, पिंगळगाव या पाच बाजार समित्यांच्या एकही बैठकीला सहाय्यक निबंधक उपस्थित राहिले नाहीत तर घोटी वगळता अन्य बाजार समित्यांच्या चार, दोन बैठकांनाही सहाय्यक निबंधकांनी हजेरी लावल्याचे स्पष्ट झाले. त्यावर देशमुख यांनी अधिकाºयांना गैरहजर राहण्याविषयी जाब विचारला. बैठकीला गैरहजर सहाय्यक निबंधकांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा घ्यावा, खुलासा योग्य न वाटल्यास संबंधितांवर कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. सहायक निबंधकांनी बाजार समित्यांच्या बैठकांना शंभर टक्के उपस्थित राहावे अन्यथा बाजार समित्यांनी चुकीचे निर्णय घेतल्यास त्याबाबत सहाय्यक निबंधकांना जाब विचारण्यात येईल असा इशारा दिला. बाजार समित्यांनी चुकीचे निर्णय घेतला तर तात्काळ त्याबाबत सहकार विभागाला कळवावा जेणे करून त्वरीत कारवाई करता येईल असेही त्यांनी सांगितले. या संदर्भात सहकार विभागाने आॅनलाईन सॉफ्टवेअर तयार केले असून, त्यात अधिका-यांनी माहिती भरणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले.यावेळी विविध कार्यकारी सोसायट्या सक्षम करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. सोसायट्या सहकारी तत्वावर व्यवसाय करू इच्छित असतील तर तसा प्रस्ताव महाराष्टÑ सहकार विकास कार्पोरेशनकडे सादर करण्यात यावा व सोसायट्यांना त्यासाठी प्रोत्साहीत करावे अशा सुचनाही त्यांनी केल्या. सहकारी सोसायट्याकडून ठेवी गोळा केल्या जात असल्या तरी त्या जिल्हा बॅँकेत ठेवण्याची सक्ती केली जाते व अशा वेळी जिल्हा बॅँक सोसायटीच्या ठेवी कर्जवसुलीत वळते करून घेते त्यामुळे सोसायट्यांना राष्टÑीयकृत बॅँकेत ठेवी ठेवण्याची मुभा दिली जावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देशमुख यांनी दिले. यावेळी जिल्हा निबंधक निळकंठ करे उपस्थित होते.
बाजार समितीच्या बैठकीस न जाणा-या निबंधकावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 3:27 PM
नाशिक जिल्ह्यातील सहकार निबंधकांच्या कामकाजाचा आढावा घेताना देशमुख बोलत होते.जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या मासिक बैठका व त्यास संचालक म्हणून सहाय्यक निबंधकांची उपस्थितीचा देशमुख यांनी आढावी घेतला यावेळी बाजार समित्यांच्या बैठकांना सहाय्यक निबंधक हजर राहात नसल्याचे निदर्शनास आले.
ठळक मुद्देसुभाष देशमुख : चुकीचे ठराव झाल्यास जबाबदार धरणार सहाय्यक निबंधकांना कारणे दाखवा नोटीस