येवला : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा वापरावर निर्बंध घालण्याची मागणी वाढलेली आहे. नायलॉन मांजाच्या वापराला आळा घालण्यासाठी येवला नगरपालिका व शहर पोलीस स्टेशन यांच्यातर्फेगुरुवारी दुपारी संयुक्त तपासणी मोहीम हाती घेऊन मांजा विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एका विक्रेत्याकडे सुमारे १५०० रुपयांचा नायलॉन दोरा तपासणीत आढळल्याने या दोरा विक्र ेत्या विरोधात येवला शहर पोलिसांनी थेट कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे.या नायलॉन मांजाच्या गुंत्यात सापडल्यामुळे पक्ष्यांचे मृत्यूही वाढीला लागले आहेत. त्यावर आळा घालण्यासाठी पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरु केली आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलीस व पालिका यांच्या पथकाने, वाल्मीक पतंग स्टॉल, कमालकर स्टोअर्स, सुभाष पतंग स्टॉल, करवा पतंग, आम्रपाली जनरल, ए-वन पतंग स्टॉल या सहा दुकानांची अचानकपणे तपासणी केली. यात तपासणीत ए-वन पतंग स्टॉलमध्ये सुमारे १५०० रुपयांचा नायलॉनचा दोरा आढळला. मुलतानपुरा भागातील दोरा विक्रते, शेख इंतजार कमरुद्दीन यांनी पोलिसांच्या आदेशाचा भंग करीत दुकानात विक्र ीसाठी नायलॉनचा दोरा ठेवला. मुंबई पोलीस कायदा कलम १३४ प्रमाणे न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे. नायलॉन दोऱ्यावर संपूर्णत: बंदी घालावी या मागणीसाठी कुक्कर गल्ली मित्रमंडळ, ल.ब.क. फ्रेंड सर्कलच्या कार्यकर्त्यांनी नगरसेवक गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली येवला तहसीलदार नरेश बिहरम,पोलीस निरीक्षक संजय पाटील,मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदन दिले होते. (वार्ताहर)नायलॉन मांजा बंदीबाबत प्रबोधन केले होते. दुकानदाराकडे नायलॉन दोरा आढळल्यास त्यांच्यासह नायलॉन मांजावर पतंग उडवणाऱ्यांवर प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सूचित केले होते. अचानकपणे केलेल्या तपासणीत नायलॉन दोरा सापडलाच. दुकानदारांनी कायद्याचे पालन करावे. -संजय पाटील, पोलीस निरीक्षक, येवला
नायलॉन मांजा विक्र ेत्यांवर कारवाई
By admin | Published: December 29, 2016 11:44 PM