विंचूर : येथे विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. तसेच गावातील दुकानांमध्ये मास्क, सॅनिटायझर यांसह कोरोना नियमावलीचे पालन होत आहे की नाही याबाबत पाहणी केली.
सध्या विंचूर येथे कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण जास्त आहे. दोन दिवसापूर्वीच बारा रुग्ण आढळून आले. असे असतानाही विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून अनेक दुकानदार सायंकाळी सात नंतर दुकाने बंद करत नसल्याने ग्रामपालिकेने वेळोवेळी दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. प्रांताधिकारी अर्चना पठारे आणि तहसीलदार शरद घोरपडे यांसह गटविकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी गादड तसेच ग्रामविकास अधिकारी जी. टी. खैरनार, तलाठी सागर शिर्के आदी ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.