शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

75 वाहनधारकांवर आरटीओची कारवाई

By admin | Published: December 15, 2015 12:19 AM

75 वाहनधारकांवर आरटीओची कारवाई

नाशिक : रस्ते अपघाताला आळा बसवा यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) विशेष तपासणी मोहीम साधारणत: महिनाभरापूर्वी सुरू केली होती़ या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यास सोमवार (दि़१४)पासून सुरुवात झाली़ मोहिमेच्या पहिल्या दिवशी ७२ दुचाकीचालक व तीन कारचालकांवर कारवाई करण्यात आली़ प्रादेशिक परिवहन विभागाने गत महिन्यात विशेष वाहन तपासणी मोहीम राबविली होती़ या मोहिमेच्या दुसरा टप्प्यास सोमवारपासून सुरुवात झाली असून, १८ डिसेंबरपर्यंत ती सुरू राहणार आहे़ सोमवारी (दि़ १४) नाशिक-पेठ व नाशिक-मुंबई रस्त्यावर वाहनांची तपासणी करण्यात आली़ मंगळवार (दि़ १५) नाशिक-दिंडोरी व नाशिक- त्र्यंबकेश्वर रोड, बुधवारी (दि़१६) नाशिक-धुळे व नाशिक-गंगापूर रोड, गुरु वारी (दि़ १७) नाशिक-औरंगाबाद व कॉलेजरोड तर शुक्र वारी (दि़ १८) नाशिक-पुणे रोड व उंटवाडी, सिडको रोड या रस्त्यावर वाहन तपासणी करण्यात येणार आहे. आरटीओतर्फे राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील वाहन तपासणीत ९३६ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई, तर ४५० नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले होते़ सोमवार ते शुक्रवार या कालावधीत कारवाई करण्यात येणाऱ्या वाहनचालकांना दंडात्मक कारवाईबरोबरच पहिल्या व तिसऱ्या शनिवारी समुपदेशनासाठी बोलविण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)