नांदगाव : विनापरवाना माती व गाळ वाहतूक करणाऱ्यांवर नांदगाव वनविभागाने कारवाई करत एक जेसीबी व पाच ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करत सहा वाहनधारकांवर वन कायद्यानुसार कारवाई केली आहे. यामुळे वाळू व माती-रेती अवैध तस्करी करणाºया माफियांचे धाबे दणाणले आहेत. वनविभागाला मिळालेल्या माहितीवरून वनपरीक्षेत्र अधिकारी विक्रम अहिरे, वनपाल हमीद शेख, सुनील खंदारे, वनर क्षक दिलीप उचाळे, नाना राठोड आदींनी चिंचविहीर येथे धाव घेतली असता तेथील वनविभागाच्या हद्दीतून विनापरवाना माती व गाळ वाहून नेण्याचे काम गुपचुपपणे सुरू होते. या वाहनधारकांकडे माती, (पोयटा) गाळ वाहतूक करण्याचे कोणतेच परवाने नव्हते. दरम्यान, वनविभागाच्या मन्याड नदी, पांझण नदी, शाकंबरी व लहान-मोठे नाले येथे विनापरवाना रेती-मातीची चोरी होत असते. यावर अंकुश ठेवण्यास महसूल विभाग व वनविभाग कुचकामी ठरत आहेत, तर चिंचविहीर येथील माती व गाळ वाहून नेण्याचे कामात वाहनधारकांत आपसातील समन्वयाचे अभावी या विनापरवाना माती व गाळ वाहतुकीचे बिंब फुटले तरीसुद्धा वनविभागाला कारवाई करण्यासाठी तीन दिवस लागले.यांच्यावर कारवाईवाहनचालक तथा मालक देवीदास रामराव कटारे, सुनील मोरे, चिंचविहीर, बबन बुरकुल, बाळू बुरकुल, उत्तम बुरकुल, पंजाब इपर, भास्कर गिते, सर्व रा.जळगाव बु. यांच्यावर भारतीय वन कायदा अधिनियम १९२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहने वनविभागाने ताब्यात घेतली आहेत.
नांदगावी सहा वाहनधारकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:19 AM