नाशिक : पक्षविरोधी कारवाई केली म्हणून दोघा प्रदेश पदाधिकाऱ्यांसह एका तालुका अध्यक्षाच्या हकालपट्टीच्या कारवाईवरून जिल्हा कॉँग्रेसमध्ये गोेंधळ उडाला असून, हकालपट्टी केलेल्या पदाधिकाऱ्यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन कैफियत मांडल्याचे समजते. दरम्यान, उमेदवारांच्या तक्रारीवरूनच तिघा पदाधिकाऱ्यांची प्रदेश स्तरावरून हकालपट्टीची झालेली कारवाई कायदेशीर असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या सभेतच उमेदवारांनी लेखी तक्रारी केल्या. आपल्याला विचारणा झाल्यावर आपणही अहवाल पाठविला असून, हकालपट्टीची कारवाई प्रदेश स्तरावरून झाली असून, मागे घेतली जाणार नाही. निवडणुकीच्या काळातील कारवाई असल्याने तिला कारणे दाखवा नोटीसची गरज नाही.
काँग्रेसमध्ये हकालपट्टीवरून गोेंधळ हकालपट्टीची कारवाई
By admin | Published: December 06, 2014 1:01 AM