शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

निधीचा दुरुपयोग झाल्यास कारवाई :  दादा भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 1:12 AM

मालेगाव तालुक्यातील दाभाडी क्लस्टरमध्ये समाविष्ट गावांचा विकास करताना नव्या संकल्पनांचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन करतानाच क्लस्टरच्या निधीचा दुरुपयोग झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिला.

नाशिक : मालेगाव तालुक्यातील दाभाडी क्लस्टरमध्ये समाविष्ट गावांचा विकास करताना नव्या संकल्पनांचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन करतानाच क्लस्टरच्या निधीचा दुरुपयोग झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिला.  जिल्हा परिषदेच्या सभागृहात रूरबन मिशन अंतर्गत दाभाडी क्लस्टरमधील विकासकामांची आढावा बैठक भुसे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.  ग्रामसेवकांनी मिशन रूरबन मिशन अंतर्गत कामाचा प्राधान्याने पाठपुरावा करून वेळेत काम होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे आवाहन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्व यंत्रणांना कालबद्ध पद्धतीने कामांचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. आयआयटी सल्लागार नेमून चांगल्या दर्जाची कामे कशी होतील याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमोद पवार यांच्यासह अन्य खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.प्रस्ताव सादर करण्याचे आदेशदाभाडी क्लस्टर अंतर्गत गावातील पाणीपुरवठा योजनांचा आराखडा येत्या आठ दिवसांत सादर करण्यात यावा, पर्यावरणपूरक शौचायलयांचे मॉडेल अभ्यासून त्यानुसार शौचालयांचे युनिट उभारण्यात यावे, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व कामे वेळेत होतील रस्त्यांची सर्व कामे नियोजित वेळेत होतील याची दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.  क्लस्टरमधील पददिवे नसलेल्या गावांचा समावेश रूरबन योजनेंतर्गत करण्यात यावा, कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे, ठिबक सिंचनासाठी अधिकाधिक शेतकºयांना प्रोत्साहित करण्यात येऊन ग्रामपंचायतीचे नवे कार्यालय उभारण्याबाबतचे प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदministerमंत्री