इंदिरानगर : न्यायालयाच्या निर्देशानुसार मागील महिन्यात वडाळा गावातील पांढरीआई ते मांगीरबाबा चौक या शंभर फुटी रस्त्यावरील धार्मिक स्थळ हटविण्यात आले, परंतु रस्त्याच्या मधोमध असलेल्या अनधिकृत झोपड्यांबाबतचा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याचीच दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शनिवारी (दि.१६) सावित्रीबाई फुलेनगर लगत वसलेल्या झोपडपट्टीतील सुमारे ३५० अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई पोलीस बंदोबस्तात पार पाडली. दरम्यान, प्रत्येक झोपडी किंवा पक्क्या घरांवर जेसीबी चालवण्यापूर्वी ‘प्रथम आम्हाला घरकुल योजनेत घरकुल द्या, मगच जेसीबीचा पंजा मारा’ असे सांगत रहिवाशांनी मोहिमेस वारंवार अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर काही झोपडीधारकांनी कारवाईपूर्वीच स्वयंस्फूर्तीने झोपड्या काढून घेतल्याने त्यांचे संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान टळले. दरम्यान, येत्या सोमवारीही उर्वरित अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.दहा वर्षांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्ग आणि पुणे महामार्ग यांना जोडणारा शंभर फुटी रस्ता बनवण्यात आला. राजीवनगर वसाहत, कलानगर, राजसारथी सोसायटी, वडाळागाव, डीजीपीनगर क्र मांक एक या मार्गे हा शंभर फुटी रस्ता तयार करण्यात आल्याने सदर मार्गावर दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते. मात्र वडाळागावातील पांढरीआई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभर फुटी रस्त्याच्या मधोमध आणि दुतर्फा अनधिकृत झोपड्या असल्याने वाहतुकीस अडथळा होत असे, तसेच लहान-मोठे अपघात होऊन वादविवादाच्याही घटना घडत होत्या. महापालिकेकडे वारंवार निवेदने देऊनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना होती. अखेर शनिवारी महापालिकेच्या अतिक्र मण निर्मूलन मोहिमेस सकाळी १०.३० वाजता पांढरीआई चौकातून प्रारंभ झाला. शंभर फुटी रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाºया आणि ज्यांना घरकुल योजनेत घर देऊनसुद्धा झोपड्या खाली न करणाºयांवर कारवाई करण्यास सुरु वात करण्यात आली. प्रत्येक घर आणि झोपडीवर जेसीबीचा पंजा मारण्यापूर्वीच संबंधित घरमालक व काही राजकीय पुढारी हस्तक्षेप करून प्रथम यांना घरकुल योजनेत घर द्या मगच कारवाई करा, असे सांगून वारंवार कारवाईस अडथळा निर्माण करत होते. त्यामुळे कारवाईस विलंब होत असल्याने संथगतीने काम सुरू होते. सुमारे सात तास चाललेल्या या मोहिमेत सुमारे १२० पत्र्याच्या शेडचे आणि पक्की बांधकाम केलेली घरे जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान, अर्ध्याच्या वर अनधिकृत झोपडीधारकांनी घरे खाली केली नव्हती मात्र, जेव्हा जेसीबी आला तेव्हा घरातील सामान बाहेर काढण्यासाठी रहिवाशांची धावपळ उडाली होती. सदर मोहिमेत पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक उपायुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये, पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, सुनीता कुमावत यांसह मनपा अधिकारी, पोलीस असे सुमारे १३० कर्मचारी पाच जेसीबी व पाच ट्रक या ताफ्यासह हजर होते. दरम्यान, येत्या सोमवारीही अतिक्रमण विरोधी मोहीम सुरूच राहणार असून, तोपर्यंत रहिवाशांनी आपले बांधकाम स्वत:हून काढून घ्यावे, असे आवाहन मनपाने केले आहे.
महापालिकेकडून कारवाई : सुमारे ३५० झोपड्या जमीनदोस्त, मोहिमेत अडथळा आणण्याचा प्रयत्न वडाळागावातील झोपडपट्टी हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 1:37 AM
न्यायालयाच्या निर्देशानुसार मागील महिन्यात वडाळा गावातील पांढरीआई ते मांगीरबाबा चौक या शंभर फुटी रस्त्यावरील धार्मिक स्थळ हटविण्यात आले,
ठळक मुद्दे३५० अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान टळलेशंभर फुटी रस्ता बनवण्यात आला