शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

मालेगावात धारदार शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 1:47 AM

जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात काल रात्रीपासून राबविण्यात आलेल्या कोम्बिंग आॅपरेशन व नाकाबंदी कारवाईत मालेगावात धारदार शस्त्रे बाळगणाºया एकास अटक करण्यात आली, तर मनमाड येथे देशी बनावटीची पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह एकास अटक करण्यात आली.

ठळक मुद्देकोम्बिंग आॅपरेशन : नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाईमनमाडला पिस्तूल जप्त

मालेगाव : जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात काल रात्रीपासून राबविण्यात आलेल्या कोम्बिंग आॅपरेशन व नाकाबंदी कारवाईत मालेगावात धारदार शस्त्रे बाळगणाºया एकास अटक करण्यात आली, तर मनमाड येथे देशी बनावटीची पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह एकास अटक करण्यात आली.अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल व विशाल गायकवाड यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणेनिहाय कोम्बिंंग आॅपरेशन, नाकाबंदी व आॅलआउट स्कीम राबवून कारवाई केली. त्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार, फरार असलेले आरोपी, हिस्ट्रीसिटर यांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान संशयित व विनानंबरची वाहने, मद्यसेवन करून वाहन चालविणारे, सार्वजनिक, मुख्य चौकात विनाकारण हुल्लडबाजी करणाºया इसमांवर कारवाई करण्यात आली.महामार्ग व मुख्य रस्त्यांवरील हॉटेल, ढाबे यांची तपासणी करून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या ढाबे मालकांवर कारवाई करण्यात आली. पोलीस ठाणे हद्दीतील मुख्य रस्ते, बाजार पेठ, सराफ बाजार, बॅँक व एटीएम, धार्मिकस्थळे, रेल्वे व बसस्थानक, टोलनाके अशा ठिकाणांवर सशस्त्र पेट्रोलिंग करुन संशयित इसमांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. आॅलआउट स्कीमअंतर्गत पेट्रोलिंगवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनमाड शहरात अवैधरीत्या गावठी पिस्तूल बाळगणाºया इसमास ताब्यात घेऊन कारवाई केली.मनमाड शहरातील मालेगाव चौफुली परिसरात विनापरवाना बेकायदेशीररीत्या अवैध शस्त्र बाळगून गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या सराईत गुन्हेगार गुलाम फरीद अब्दुल वाहीद उर्फ बोबड्या (रा. मोहनबाबानगर मालेगाव) यास पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील हिरो सीबीझेड दुचाकी (क्रमांक एमएच ४१ क्यू २२३४) ताब्यात घेण्यात आली. त्याची अंगझडती घेतली असता देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्या विरोधात मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या विरुद्ध जबरी चोरी व गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत.६४ गुन्हेगारांची तपासणीनाकाबंदी, कोम्बिंग आॅपरेशन व आॅलआउट स्कीमदरम्यान कारवाईत जिल्ह्यातील एकूण ६४ रेकॉर्डवरील गुन्हेगार व हिस्ट्रीसिटर यांची तपासणी करण्यात येऊन त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. बेदरकारपणे वाहन चालविणारे, विनानंबर वाहन वापणारे, मद्यसेवन करुन वाहन चालविणारे असे एकूण १३९० वाहने तपासण्यात आली. मोटारवाहन कायद्यानुसार २३९ कसेस करून ४८ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला. फरार नऊ आरोपींना पकडण्यात आले. अवैधरीत्या दारू विक्री व तयार करणाºया इसमांवर छापा टाकून १३ केसेस करण्यात आल्या.२८ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबई जुगार कायद्यानुसार तीन केसेस करण्यात आल्या. महामार्गावर रात्री उशिरापर्यंत ढाबे, हॉटेल सुरू ठेवणाºया मालकांवर कारवाई करण्यात आली. न्यायालयाकडून प्राप्त झालेले ४८ सन्मस, २२ बेलेबल वॉरंट व २३ नॉन बेलेबल वॉरंटची मोहिमेदरम्यान अंमलबजावणी करण्यात आली.मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे हे त्यांच्या पथकासह मध्यरात्रीच्या सुमारास दातारनगर साठफूटी रोड परिसरात कोंबींग आॅपरेशन करीत असताना इम्रानखान अताउल्ला खान उर्फ शेट्टी रा. दातारनगर व शकील अहमद निसार अहमद रा. अब्दुल्लानगर हे अवैधरित्या धारदार शस्त्रे बाळगताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातुन दोन तलवारी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी मालेगावी पवारवाडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक