देवळा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदी नियमाचे उल्लंघन करणाºया व विनाकारण रस्त्यावर फिरणाºया वाहनचालकांवर देवळा पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत चालली असून, सर्व जण काळजीत पडले आहेत. राज्यात आठवडाभरापूर्वी लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. देवळा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातदेखील नागरिक कोरोनाविषयी गंभीर असून, शासनाने दिलेल्या तोंडाला मास्क लावणे, हात साबणाने धुणे, सोशल डिस्टन्सिंग, गर्दी न करणे आदी नियमांचे पालन करीत आहेत; परंतु या गोष्टीचे गांभीर्य नसलेल्या काही बेफिकीर युवक व नागरिकांना पोलिसांनी काठीचा प्रसाद देत दंडात्मक कारवाई केली. पोलिसांनी संचारबंदीची कठोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. देवळा येथील पाचकंदील चौकात येणाºया वाहनांची तपासणी करण्यात येत असून, वाहनचालकांना घराबाहेर का पडले याचे कारण विचारले जात आहे. यातून अत्यावश्यक सेवा देणारी तसेच मालवाहतूक करणारी वाहने वगळता इतर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 11:32 PM