लोहोणेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन विनामास्क फिरणाºया वाहनचालक, व्यावसायिकांवर लोहोणेर ग्रामपंचायतीच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, विनामास्क फिरणाऱ्यांकडून सुमारे ४७०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी यू. बी. खैरनार यांनी दिली आहे.कोरोनाची वाढती लक्षणे लक्षात घेऊन विनामास्क फिरणाºयांची वाढती संख्या लक्षात घेऊन लोहोणेर ग्रामपंचायतीकडून प्रथमच अशी कार्यवाही करण्यात आली असल्याने विनामास्क फिरणाºयांचे धाबे दणाणले आहेत. काही महाभाग मात्र या कारवाईस हेतुपुरस्सर विरोध करीत आहेत. मात्र ग्रामपंचायतीने सदरची वसुली मोहीम सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जाते आहे. या वसुली पथकात भूषण आहिरे,दत्ता जाधव आदी कर्मचारी सहभागी होते.दरम्यान, आज झालेल्या मासिक मीटिंगमध्ये ५० टक्के अपंग अर्थसाह्य अनुदान अंतर्गत माहे एप्रिलच्या मीटिंगमध्ये मंजुरी घेऊन सुमारे २० लाभार्थींना प्रत्येकी हजार रुपयेप्रमाणे एकूण २० हजार रुपये रक्कम अपंगाच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.अपंगाच्या मालमत्तेवर ५० टक्के सूट मिळणार असल्याने सदर योजनेचा दरमहा लाभही मिळणार आहे. अपंग व्यक्तींनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले असून, यावेळी सरपंच जयवंता बच्छाव, किशोर देशमुख, निबा धामणे, हिरामण वाघ, धनंजय महाजन, मधुकर बच्छाव, सुरेखा आहिरे, शशिकला बागुल, लताबाई पवार, ग्रामविकास अधिकारी यू. बी. खैरनार आदी उपस्थित होते.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 9:42 PM