शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

नियमभंग करणाऱ्या फटाके विक्रेत्यांवर कारवाई

By admin | Published: October 21, 2016 2:04 AM

गाळ्यांची होणार तपासणी : ३४५ गाळ्यांना पोलिसांची परवानगी

 नाशिक : दिवाळीचा सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्यापही महापालिकेकडून फटाके विक्रीसाठी गाळ्यांची लिलावप्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी शहरात ३४५ गाळे उभारणीस परवानगी दिली आहे. मात्र, विस्फोटक विनियम व नियमांचा भंग करणाऱ्या फटाके विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून, महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फतही ना हरकत दाखले नाकारण्यात येणार आहेत. दरवर्षीप्रमाणे महापालिकेने शहरातील मोकळ्या जागांची यादी करत ती फटाके विके्रत्यांना उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस विभागाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार प्रारंभी पोलिसांनी २६१ पैकी २५८ गाळ्यांना परवानगी दिली तर नाशिक-पुणे रस्त्यावरील पौर्णिमा स्टॉपजवळील तीन गाळ्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर फटाके विक्रेत्यांकडून जागा मागणी वाढल्याने महापालिकेने आणखी ११७ जागांची निश्चिती करत परवानगी मागितली असता पोलिसांनी ३० गाळ्यांना परवानगी नाकारली. महापालिकेकडून आता एकूण ३४५ गाळ्यांसाठी लिलाव प्रक्रिया राबविली जात असून, गेल्या बुधवारी इदगाह मैदानावरील गाळ्यांचे लिलाव करण्यात आले. त्यातील ४० गाळे अद्यापही शिल्लक असल्याने त्याबाबतचे लिलाव शुक्रवारी (दि.२१) काढण्यात येणार आहेत तर नव्याने परवानगी मिळालेल्या ८७ गाळ्यांचा लिलाव येत्या सोमवारी (दि.२४) करण्यात येणार आहे. दरम्यान, शहरात विनापरवाना फटाक्यांचे गाळे उभारणाऱ्या विक्रेत्यांवर पोलिसांमार्फत कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फतही गाळ्यांची तपासणी करूनच ‘ना हरकत दाखला’ दिला जाणार आहे. विस्फोटक नियमातील तरतुदींनुसार, दोन गाळ्यांमध्ये १० फुटाचे अंतर असले पाहिजे, गाळ्यांची उभारणी करताना प्लॅस्टिक किंवा कापडांचा वापर न करता पत्र्याचेच शेड उभारण्यात यावेत आणि दोन गाळ्यांचे प्रवेशद्वार हे समोरासमोर न ठेवता ते विरुद्ध दिशेला असले पाहिजे, आदि नियमांची काटेकोर तपासणी केली जाणार असून, नियमभंग करणाऱ्यांना ना हरकत दाखला नाकारला जाणार असल्याची माहिती अग्निशमन प्रमुख अनिल महाजन यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)