केारोनाचे निर्बंध शिथिल केल्याने सर्वत्र गर्दी उसळत आहे. मात्र, आरोग्य नियमांचे पालन होणे जवळपास बंद झाले आहे. शासनाने व्यावसायिकांना काही अटी-शर्तीवर परवानगी दिली आहे. मॉलमध्ये जाताना दोन डाेस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासणे आवश्यक आहे. वयाचा पुरावा दाखवणे आवश्यक आहे. मॉल्स, मोठी व्यावसायिक दालने आणि हॉटेल्स हे पन्नास टक्के उपस्थितीतच चालवणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात केाणत्याही अटींचे पालन होताना दिसत नाही, अशा तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. त्यातच कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर येण्याची शक्यता आयसीएमआरने वर्तवली असून अहमदनगर तसेच कोल्हापूर येथे रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आता शहरातील मॉल्स, हॉटेल्स आणि व्यावसायिक दालनांमध्ये नियमांचे पालन होते किंवा नाही याची अचानक तपासणी करून कारवाई करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात मंगळवारी (दि.२४) सहाही विभागातील विभागीय स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षकांची
तातडीने बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी दिली.
इन्फो...
तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी सुरू असतानाच महापालिकेने सिरो टेस्ट करण्याचे ठरवण्यात आले होते. एका कंपनीकडून महापालिकेेला अर्थसाहाय्य देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे पाच हजार नागरिकांच्या तपासणीसाठी साडेतेरा लाख रुपये खर्च येणार असून तो मिळवण्यासाठी महापालिकेचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्याचवेळी संबंधित कंपनीला अशाप्रकारच्या चाचणीपेक्षा काही तरी भरीव साहित्य देण्याची इच्छा आहे. त्यामुळे सध्या हा विषय घोळात आहे.
इन्फो..
महापालिकेकडून आता आराेग्य नियमांचे उल्लंघन करण्यावर कारवाई करण्याची तयारी सुरू असली तरी सध्या मात्र ही कारवाई थंडावली आहे. मास्क न वापणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, नियमांचे पालन न करता आस्थापना सुरू ठेवणे या सर्वच बाबतीत नाशिक महापालिका आणि पाेलिसांकडून होत असलेली कारवाई जवळपास थांबली आहे.