पंचवटी : शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विना मध्यस्थ थेट ग्राहकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध झाला आहे. राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरविण्यात आला. आता हा बाजार दर शुक्रवारी भरणार आहे. या पहिल्याच आठवडे बाजाराला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.मखमलाबाद रोडवरील पांजरापोळच्या जागेवर संत सावता माळी अभियानाच्या माध्यमातून आठवडे बाजाराचा शुभारंभ झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक दिग्विजय अहेर, आत्मा संस्थेचे कैलास शिरसाठ, कळवणचे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, राजेश अय्यर, बी. सी. देशपांडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पांजरापोळ संस्थेचे विश्वस्त गोपाल जवेरी म्हणाले की, या उपक्रमामुळे माणुसकीच्या भावनेतून शेतकºयांना मदत मिळणार आहे. शेतकºयांनी सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावा व ग्राहकांनी शेतकºयांकडून शेतमाल खरेदी करून शेतकºयांना पाठबळ द्यावे, असे प्रतिपादन पांजरापोळ संस्थेचे विश्वस्त गोपाल जवेरी यांनी केले आहे. राज्य शासनाने राबविलेल्या योजनेचे चांगले उद्दिष्ट आहे. आज शेतकरी विविध अडचणीतून मार्ग काढून उपजीविका करीत आहे. शेतकरी टिकविणे ही काळाची गरज असल्याने शेतकºयांना पाठबळ दिले पाहिजे, असे ते म्हणाले.या शेतकरी आठवडे बाजारात केवळ शेतकºयांनाच शेतमाल विक्र ी करण्यासाठी परवानगी दिली आहे तसेच ११ ते २० शेतकºयांनी गट तयार करून पणन मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. याशिवाय पांजरपोळ कोणतेच शुल्क आकारणार नाही. यावेळी पांजरपोळचे व्यवस्थापक सागर आगळे, तुषार पालेजा, हेमराज राजपूत, विठ्ठल आगळे, प्रकाश झांबरे, उदय जोशी आदी उपस्थित होते. दर शुक्रवारी बाजार भरेल; परंतु शुक्र वार पाठोपाठ शनिवार, रविवारच्या दिवशीही बाजार भरविल्यास ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळेल त्यामुळे संयोजकांनी याचा विचार करावा, अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली.
उपक्रम : शेतकºयांचा माल थेट ग्राहकांपर्यंत; मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन, ग्राहकांचा उत्स्फू र्त प्रतिसाद शेतकºयांचा पहिला आठवडे बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 12:38 AM
शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विना मध्यस्थ थेट ग्राहकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध झाला आहे.
ठळक मुद्देबाजाराला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसादसेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध शेतमाल विक्र ी करण्यासाठी परवानगी