शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

अभिनयाची सम्राज्ञी जगते नाशकात हलाखीचे जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 2:07 AM

चंदेरी दुनियेला मायानगरी असे संबोधले जाते. कारण या दुनियेत सर्वच अनपेक्षित असते. एखादा रातोरात स्टार होतो, तर एखादा स्टार रातोरात या दुनियेतून गायब होतो. असाच काहीसा प्रसंग ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ जमान्यातील ‘मॉडर्न गर्ल’ यांच्या वाट्याला आला आहे. तब्बल तीन दशके चित्रपटसृष्टीवर आधिराज्य गाजविणारी अभिनेत्री स्मृती बिश्वास-नारंग सध्या नाशिकमध्ये हलाखीचे जीवन जगत आहेत.

सतीश डोंगरे ।नाशिक : चंदेरी दुनियेला मायानगरी असे संबोधले जाते. कारण या दुनियेत सर्वच अनपेक्षित असते. एखादा रातोरात स्टार होतो, तर एखादा स्टार रातोरात या दुनियेतून गायब होतो. असाच काहीसा प्रसंग ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ जमान्यातील ‘मॉडर्न गर्ल’ यांच्या वाट्याला आला आहे. तब्बल तीन दशके चित्रपटसृष्टीवर आधिराज्य गाजविणारी अभिनेत्री स्मृती बिश्वास-नारंग सध्या नाशिकमध्ये हलाखीचे जीवन जगत आहेत. कधीकाळी कोट्यवधी रुपयांची संपत्ती नावे असलेल्या स्मृती आज अवघ्या पाचशे स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटमध्ये आयुष्य कुंठित असून, वैद्यकीय उपचारासाठीही पदरी पैसे नसल्याची दयनीय अवस्था त्यांची झाली आहे.  ‘नेक दिल’, ‘अपराजिता’, ‘मॉडर्न गर्ल’ असे एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपट देत स्मृती बिश्वास यांनी १९३० ते १९६० अशी तीन दशके बॉलिवूडसह बंगाली चित्रपटसृष्टीत आधिराज्य गाजविले. ९३ वर्षीय स्मृती बिश्वास आज (दि.१७) त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहेत. आयुष्यात आलेल्या या जगण्याचे दु:ख नसून जवळच्यांनी दिलेला दगा अधिक वेदनादायी असल्याचे त्या सांगतात. त्याचबरोबर ज्या रूपेरी पडद्यावर तब्बल तीन दशके आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांवर मोहिनी घातली तीच चित्रपटसृष्टी आपल्याला विसरत चालल्याचे दु:खही त्यांच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसते.  दरम्यान, आतापर्यंत २८ ठिकाणे बदलणाºया स्मृती बिश्वास तीन वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्मप्रसारचे काम करणाºया त्यांच्या बहिणीच्या आश्रयाने मुंबईहून नाशिकला स्थायिक झाल्या. याठिकाणी त्या डॉ. राजीव आणि जितू या दोन अविवाहित मुलांसह एका छोट्या फ्लॅटमध्ये वास्तव्य करतात. त्यांची दोन्ही मुले हाताला मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. वैद्यकीय उपचारांसाठीही पदरी पैसे नसल्याने त्यांची जगण्याची धडपड काळजाला पाझर फोडणारी आहे. अशातही स्वाभिमानानेच जगणार हा स्मृती यांचा निर्धार परिस्थितीलाही हतबल करणारा म्हणावा लागेल.दादासाहेबांच्या भूमितच एकांतवासराज कपूर, किशोरकुमार, भगवानदादा, नर्गिस, बलराज साहनी यांसारख्या अभिनेत्यांसोबत स्मृती बिश्वास यांनी जवळपास ९० चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे बहुतांश चित्रपट प्रेक्षकांना भावल्याने अनेक पुुरस्कारांनी त्यांना सन्मानितही करण्यात आले. त्यातीलच एक ‘दादासाहेब फाळके गोल्डन ईरा’ या मानाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. मात्र दादासाहेबांच्या भूमित त्यांच्यावर एकांतवासात राहण्याची वेळ आली आहे.कोट्यवधींची संपत्तीस्मृती बिश्वास यांची देशभरात कोट्यवधी रूपयांची मालमत्ता आहे. मुंबई, दिल्ली, महाबळेश्वर आदी ठिकाणी त्यांचे बंगले आहेत. मात्र ती सर्व मालमत्ता केअरटेकर मंडळी तसेच काही नातेवाइकांनी बळकावल्याचे त्या सांगतात. त्याचबरोबर बिल्डर आणि अंडरवर्ल्डमधील काही भार्इंनीही लुटल्याचा दावा त्यांनी केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक