नाशिक : नाशिकला विवाह सोहळ्यासाठी आलेल्या मालेगावच्या महिलेच्या बॅगमधून सोन्या-चांदीचे दागिने ठेवलेली पर्स अज्ञात अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. पर्समध्ये जवळपास पावणेतीन लाखांचे बारा तोळे वजनाचे सोन्या चांदीचे दागिने ठेवले होते. मागील काही दिवसांपासून शहरातील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत व-हाडी महिलांना लक्ष्य करत त्यांची जबरी लूटीचे प्रमाण वाढल्याने संताप व्यक्त होत आहे.मालेगाव रावळगाव नाका येथे राहणाच्या माधुरी किशोर त्रिभुवन या मंगळवारी (दि.४) नाशिकला औरंगाबादरोडवर एका लॉन्समध्ये विवाहसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी आल्या होत्या. विवाहसोहळा आटोपल्यानंतर मालेगावला परतीच्या प्रवासाकरिता त्यांनी बस थांब्यावरील महामंडळाची बस (एम.एच.४१ बीटी ४४९६) धरली. दरम्यान, तिकिट काढल्यानंतर बस काही अंतर पुढे गेली असता त्यांच्या मोठ्या बॅगेची चैन उघडली असल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांनी घाईघाईने बॅगेतील पर्स तपासली असता ज्या पर्समध्ये दागिणे होते तीच पर्स अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचे लक्षात आले. गोंधळलेल्या स्थितित त्रिभुवन यांनी तत्काळ सदर बाब बस वाहकाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर एसटी बस पिंपळगाव बसवंत व मालेगाव येथे नेण्यात आली त्याठिकाणी बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची झडती घेतली परंतु पर्स मिळून आली नाही.त्रिभुवन यांच्या पर्समध्ये मोहनमाळ, कानातील झुबे, ठुशी व पाटल्या यासह पावणेतीन लाख रु पये किमतीचे सुमारे १२ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने होते. त्रिभुवन मालेगावला जाण्यासाठी ज्या ठिकाणाहून बसल्या त्याठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्याचवेळी सदर चोरी झाल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तिवली आहे.काल त्रिभुवन यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरूध्द पोलिसांनी जबरी लूटीचा गुन्हा दाखल केला आहे.
आडगावला बसमध्ये व-हाडी महिला लक्ष्य; पावणे तीन लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 1:58 PM
त्रिभुवन यांच्या पर्समध्ये मोहनमाळ, कानातील झुबे, ठुशी व पाटल्या यासह पावणेतीन लाख रु पये किमतीचे सुमारे १२ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने होते.
ठळक मुद्दे व-हाडी महिलांना लक्ष्य करत त्यांची जबरी लूटीचे प्रमाण