पेठ : शहरापासून कोसो दूर असलेल्या हातरु ंडी येथील आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने कला, क्र ीडा, सांस्कृतिक उपक्र मासह गुणवत्ता विकासात उत्तम कामगिरी केल्याने या शाळेला प्रथम क्र मांकाचा आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रयास फाउण्डेशनच्या वतीने आदिवासी भागातील विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये हातरुंडी शाळेने सर्वच क्षेत्रात केलेल्या कामगिरी व सहभाग यामुळे प्रथम पारितोषिक पटकावले.जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेतही या शाळेने क्र ीडा स्पर्धात उत्तम कामगिरी केली. दप्तरमुक्त शनिवार उपक्र मांतर्गत माजी सभापती महेश टोपले यांच्या हस्ते आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करून विद्यार्थी व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महेश टोपले, सरपंच भावराव सातपुते, मुख्याध्यापक पुंडलिक खंबाईत, गोविंद भोये, दत्तू कांबळे, दिलीप शिंदे, भास्कर गायकवाड, प्रदीप पाटील, राजश्री पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
गत पाच वर्षांपासून प्रयास फाउण्डेशनच्या माध्यमातून पेठ तालुक्यात विविध शैक्षणिक उपक्र म राबविण्यात येत असून, संगणक साक्षरतेबरोबर आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा घेतल्या जातात. हातरुंडी शाळेने या वर्षीचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त केला आहे.- महेश टोपले, समन्वयक, प्रयास फाउण्डेशन, नाशिक