रोहित्रावरील कायम बिघाड होत असून वीज खंडित होत आहे. ऐन सायंकाळी हा प्रकार रोजचाच व नित्याचाच आहे. बाहेर कोरोनाचे वातावरण, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, पाणीपुरवठ्याची वेळी वीज जाणे यासारख्या प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे डीपीवर भार येतो की त्यात बिघाड आहे, हे कळेनासे झाले आहे. बॉक्स पेटी खराब आहे. डीपी नवीन बदलून द्यावी. एकच फेज चालू आहे. उर्वरित दोन फेज टाकून विजेची विभागणी करावी. याबाबत वीज चोरी होत असल्यास त्याचा तपास करावा, अशी मागणी होत आहे. मुळात वीज वितरण कंपनीच्या काॅल सेंटरलाही कुणी उत्तर देत नाहीत. टोल फ्री असलेला नंबरही लागत नाही. संबंधितांनी वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सेवानिवृत्त अभियंता एकनाथ नांद्रे, सुनील बच्छाव, किशोर इंगळे, प्रा. रवींद्र मोरे, सतीश पवार, संभाजी देवरे आदींनी वीज वितरण कंपनीला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
मालेगाव कॅम्पातील आदर्शनगर परिसर अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:14 AM