नाशिक : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश करण्यात यावा, तसेच अभ्यास न करता पहिल्या टप्प्यात डीएमआयसीला अहवाल पाठविणाºया जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनने केली आहे. यासंदर्भात विभागीय उपायुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअर योजना म्हणजे देशभरातील महामार्गाभोवती इंडस्ट्रीयल कॉरिडोअर उभे करणे. नाशिक जिल्हा हा मुंबई-पुणे-नाशिक अशा सुवर्ण त्रिकोणात असतानाही दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअर योजनेतून नाशिकला वगळण्यात आले आहे. सर्वाधिक धरणाचा जिल्हा अशी ख्याती नाशिकची आहे. परंतु मुबलक पाणी नाही या कारणाने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या पहिल्या टप्प्यातून नाशिकला वगळण्यात आले. औरंगाबादला पाणीपुरवठा करणाºया जायकवाडी धरणात नाशिकमधून पाणी जाते असे असतानासुद्धा नाशिकला मुबलक पाणी नाही, असा अहवाल अभ्यास न करताच जलसंपदा विभागाने दिल्याने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमधून नाशिकला बाजू करून यात औरंगाबादचा समावेश करण्यात आला. दुसºया टप्प्यात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमध्ये नाशिकला संधी उपलब्ध आहे. याकरिता जलसंपदा विभागाकडून अभ्यास न करताच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरला अहवाल पाठविण्यात येऊ नये व नाशिकचा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमध्ये समावेश करण्यात यावा याकरिता प्रयत्न करावे तसेच अभ्यास न करता अहवाल पाठविणाºया जलसंपदा अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय, शहराध्यक्ष गणेश पवार, सोनू नागरे, प्रवीण साळुंके, स्वप्नील सोनवणे, अनिकेत कपोते, प्रशांत पाटील, बबन जाधव, मंगेश भदरगे, प्रभाकर सोनवणे आदी उपस्थित होते.पाणी नाही, मग : जायकवाडीला का सोडता?दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमध्ये नाशिकचा समावेश झाला तर नाशिकमध्ये मोठी औद्योगिक गुंतवणूक होऊन येथील कामगारांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. नाशिकच्या पाण्याचा प्रश्न ज्वलंत असताना जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येत आहे. तेथील औद्योगिकीकरणासाठी नाशिकचे पाणी देता येत असेल तर मुबलक पाण्याचा विचार करता दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमध्ये नाशिकचा समावेश करण्यात यावा, असेही म्हटले आहे.
दिल्ली-मुंबई कॉरिडोरमध्ये नाशिकचा समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:45 AM