पिंपळगाव बसवंत : रेशन दुकानांतील गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भाव दुकाने बायोमेट्रिक प्रणाली तसेच आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय सरकारकडून तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. या निर्णयाचे कार्ड धारकांकडून स्वागत होत कुटुंब प्रमुखांसह सदस्यांचे देखील आधारकार्डच्या प्रत देण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा रेशन कार्डमधील सदस्यांच्या आधार कार्डचे सत्यापन (पडताळणी) करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहेअन्यथा, रेशन मिळणार नसल्याचे रेशन दुकानदारांनी सांगितल्यावर नागरिक धास्तावले आहे. त्यामुळे रेशन धान्य दुकानांत आधार कार्ड जमा करण्यासाठी कार्ड धारकांची तारांबळ उडाली आहे.रेशनिंग व्यवस्थेतील दोष आणि गैरव्यवहारांबाबत सरकारकडे अनेक तक्रारी येत होत्या. त्यासाठी सरकारने रेशनिंग व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. या माध्यमातून पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूंचे नियमित, विहित वेळेत आणि पारदर्शी पद्धतीने वितरण करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा आधार घेण्यात आला. त्यानुसार, ई-केवायसी करण्यासह बायोमेट्रिक आणि पोर्टेबिलिटी पद्धतीचा अवलंब सुरू झाला. ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण होऊ लागले. शिधावाटप अधिकाऱ्यांद्वारे वेळोवेळी करण्यात आलेल्या आवाहनामुळे शिधापत्रिका धारकांनी आपले व कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, आपली जुनी शिधावाटपपत्रिका, बँकेचे पासबुक तसेच स्वत:चे छायाचित्र घेऊन अर्जदेखील भरून दिले होते. मात्र आता आधार पडताळणीसाठी शिधापत्रिकेवरील सर्वच सदस्यांचे आधार कार्ड रेशन कार्डसोबत पडताळणी केली जात आहेत.
याबाबत वारंवार जनजागृती करूनही सदस्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने प्रत्येकाने आधार कार्डचे सत्यापन करून घेणे सक्तीचे आहे. अन्यथा रेशन मिळणार नाही व नावे वगळल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित रेशन कार्ड धारकांची असेल, असा इशारा दिल्यावर नागरिकांची दुकानांवर तुडुंब गर्दी झाली आहे.कोटयापूर्वी रेशन कार्डला कुटुंब प्रमुखांचीच आधारची परत जोडण्यात आली होती मात्र यावेळी शासनाच्या निर्यायानुसार कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार कार्डची प्रत जोडणे अनिवार्य असल्याने नागरिकांनी लवकरात लवकर आधार कार्डच्या प्रति रेशन धान्य दुकानात जमा करावी.शरद घोरपडे, तहसीलदार, निफाडआम्ही तीन वर्षांपूवी रेशन धान्य दुकानात कुटुंबाप्रमुखासह सर्व सदस्यांची आधार कार्डची प्रत जमा केली होती मात्र यावेळी रेशन धान्य घेण्यासाठी गेलो असता पुन्हा आधारची प्रत मागण्यात आली. त्यामुळे आधारकार्डच्या किती प्रती जमा करायच्या, हेच कळत नाही प्रशासनाने या संदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे.- लाभार्थी, पिंपळगाव बसवंत.