पंचवटी : मराठा समाजासाठी उभारण्यात आलेल्या पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या सभागृहात मराठा क्रांती मोर्चा, मराठा संघटना शिवजन्मोत्सव समितीची संयुक्त बैठक गुरुवारी तुषार जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत शिवजयंती उत्सव कार्यकारिणी निवडण्यात येऊन त्यांना व्यसनमुक्तीची शपथ देत शिवजन्मोत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी नीलेश मोरे तर उपाध्यक्ष संजना पगार, कार्याध्यक्ष म्हणून संतोष पेलमहाले यांची निवड करण्यात आली.बैठकीचे प्रास्ताविक सचिन पवार यांनी केले तर आभार शिवजन्मोत्सव समिती कार्याध्यक्ष किरण पारकर यांनी मानले. यावेळी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात खजिनदार म्हणून दिलीप निमसे, सहखजिनदार सागर पवार, सरचिटणीस किरण पगारे, नीलेश आल्हाटे, चिटणीस सोपान देवकर यांची तर उर्वरित कार्यकारिणीत साहिल बैरागी, दीपक सानप, मंगेश धनवटे, बापू सपकाळ, आकाश जगताप, नीलेश गायके यांची निवड करण्यात आली. बैठकीला संतोष पेलमहाले, मनोज जाधव, विलास जाधव, सचिन शिंदे, राज भामरे, प्रवीण भाटे, कुणाल भवर, रोहित जाधव, हेमंत मोरे व मराठा क्रांती मोर्चा मराठा संघटना तसेच शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.मर्दानी खेळाचे नियोजनयंदा शिवजन्मोत्सव डीजेविरहित साजरा करण्यात येणार असून, सर्व जातीच्या नागरिकांना सामावून घेऊन सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात येणार आहे, तसेच अनेक मर्दानी खेळांचे नियोजन केले जाणार आहे. शिवजन्मोत्सव निमित्ताने तरुण पिढीला व्यसन सोडण्याचा संदेश देण्याची शपथ दिली जाणार आहे.
शिवजन्मोत्सवात व्यसनमुक्ती शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:53 AM
मराठा समाजासाठी उभारण्यात आलेल्या पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या सभागृहात मराठा क्रांती मोर्चा, मराठा संघटना शिवजन्मोत्सव समितीची संयुक्त बैठक गुरुवारी तुषार जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत शिवजयंती उत्सव कार्यकारिणी निवडण्यात येऊन त्यांना व्यसनमुक्तीची शपथ देत शिवजन्मोत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
ठळक मुद्देविविध उपक्रमांचे आयोजन : पंचवटी शिवजन्मोत्सव समिती जाहीर