नाशिक : जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. शनिवारी (दि.५) जिल्ह्यात नव्याने ९५१ रुग्णांची भर पडली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४२ हजार ५१६ इतकी झाली आहे. दिवसभरात १० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बळींचा आकडा ९२१ इतका झाला आहे. शनिवारीही सर्वाधिक ७२४ रुग्ण शहरात तर ग्रामीण भागात १३७ रुग्ण मिळून आले. दिवसभरात ९७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आठवडाभरापूर्वी कोरोनाबधित रुग्णांचा आकडा घसरला होता; मात्र सण-उत्सवांच्या काळात पुन्हा कोरोना रु ग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवसभरात जिल्ह्यात १ हजार ४९० संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी एक हजार १३५ रु ग्ण शहरातील आहे.३४ हजार १३५ रुग्ण बरेशुक्रवारी ग्रामीण भागात १६९ कोरोनाचे रुग्ण आढळले होते, शनिवारीही हा आकडा घसरला. ग्रामीणमध्ये केवळ १३७ रुग्ण मिळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत ३४ हजार १३५ रुग्ण बरे झाले आहेत, तर ७ हजार ४६० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.३१ टक्के इतके आहे. शनिवारी १० रुग्ण मृत्युमुखी पडले. यामध्ये शहरातील ४ तर ग्रामीण भागात ५ आणि मालेगाव मनपा हद्दीत १ अशा रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ९८ हजार ४३३ रुग्ण निगेटिव्ह आले असून, २ हजार ३७८ रुग्णांचे नमुना चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. एकूण १ लाख ४३ हजार ३२७ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.सिन्नर तालुक्यात बाधितांच्या संख्येसोबतच मृत्यूचे प्रमाण वाढत असले तरी १०९५ रुग्णांची कोरोनाला परतावले असल्याने यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.निफाड तालुक्यात प्राप्त अहवालानुसार ९४ नवीन कोरोना-बाधित रु ग्ण आढळून आले आहेत. ओझर येथे २० रु ग्ण आढळले आहेत. बेहेड येथे १० रु ग्ण, पिंपळगाव बसवंत येथे ९, पालखेड येथे ८ रु ग्ण आढळले आहेत.येवला शहरासह तालुक्यातील१४ संशयितांचे कोरोना अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले आहेत. अंदरसूल येथील ७३ वर्षीय महिलेसह मुखेड येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे, तर आठ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात ९५१ नव्या रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 1:22 AM
जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. शनिवारी (दि.५) जिल्ह्यात नव्याने ९५१ रुग्णांची भर पडली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४२ हजार ५१६ इतकी झाली आहे. दिवसभरात १० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बळींचा आकडा ९२१ इतका झाला आहे. शनिवारीही सर्वाधिक ७२४ रुग्ण शहरात तर ग्रामीण भागात १३७ रुग्ण मिळून आले. दिवसभरात ९७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
ठळक मुद्देकोरोना : दिवसभरात ९७३ रुग्ण झाले ठणठणीत बरे