नाशिक : शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असे प्रवेश खासगी क्लासचालक आणि शिक्षण संस्थांच्या संगनमताने झाल्याचाही आरोप होत आहे.त्यामुळे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे पुणे येथील माध्यमिक व उच्च माध्यमामिक शिक्षण संचालक, शिक्षण मंडळाचे सचिव, सर्व शिक्षण उपसंचालकांसह सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना महापालिका क्षेत्राजवळच्या ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा प्रवेशांची चौकशी करून अतिरिक्त प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचे आदेश दिले आहे.अकरावीच्या आॅनलाइन प्रक्रियेला फाटा देऊन एकत्रित प्रवेश मिळविण्यासाठी तसेच बायोमेट्रिक हजेरी चुकविण्यासाठी अनेक खासगी क्लासचालकांनी शहर परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांसोबत संगनमत करून प्रवेक्ष क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश करून घेतले आहे.नाशिकमधील गिरणारे व ढकांबे येथील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अशाप्रकारे क्षमतपेक्षा अधिक प्रवेश झाल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी सांगितले. गिरणारे येथील ३४, तर ढकांबे येथील जवळपास दीडशे विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याच्या सूचना चौकशी समितीने केल्या असून, या विद्यार्थ्यांवर कारवाई होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कनिष्ठ महाविद्यालयांतील अतिरिक्त प्रवेश होणार रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:43 AM
शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असे प्रवेश खासगी क्लासचालक आणि शिक्षण संस्थांच्या संगनमताने झाल्याचाही आरोप होत आहे.
ठळक मुद्देशिक्षण उपसंचालकांना चौकशीचे आदेश