लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : निवासी क्षेत्रात सुरू केलेल्या परंतु नोंदणी न होऊ शकलेल्या दहा बेडच्या सुमारे २७३ रुग्णालयांना महापालिकेच्या नगररचनासह वैद्यकीय विभाग व अग्निशामक दलाची परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर रुग्णालयांनी केलेले अतिरिक्त बांधकाम १० टक्के हार्डशिप प्रीमिअम आकारून नियमित केले जाणार असून, १० बेड्सबरोबरच इमर्जन्सी सेवेसाठी पाच अतिरिक्त बेडलाही मंजुरी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांच्या विशेष अधिकारात हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात एकूण ५६६ रुग्णालये आहेत. त्यात नर्सिंग होम, मॅटर्निटी होम यांचा समावेश आहे. आतापर्यंत १८३ रुग्णालयांच्याच नोंदणी प्रमाणपत्रांचे नूतनीकरण झालेले असून, ३८३ रुग्णालयांचे अद्यापही नूतनीकरण झालेले नाही. त्यात बऱ्याच रुग्णालयांनी निवासी क्षेत्रात काम सुरू केले परंतु, वैद्यकीय विभागाचे नोंदणी प्रमाणपत्र घेतलेले नाही, शिवाय अतिरिक्त बांधकाम प्रकरणीही अनेकांची अडचण निर्माण झाली होती. याबाबत तोडगा काढण्यासाठी आयएमएने आयुक्तांना साकडे घातले होते. त्यानुसार, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, अग्निशमन प्रमुख अनिल महाजन, नगररचनाचे सहायक संचालक आकाश बागुल आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांची समिती नेमली होती.या बाबींची करावी लागणार पूर्तता४इमारतींमधील अन्य रहिवासी यांना बाधा पोहोचणार नाही, याबाबत संबंधितांचे हमीपत्र.४वापर बदलासाठी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र.४आतापर्यंत दीड मीटरच्या जिन्यासाठी परवानगी होती. परंतु, आता जिन्यासाठी १.२ मीटरपर्यंत सवलत देण्यात आली आहे.४व्यावसायिक इमारतीत जिना व लिफ्टची सुविधा असेल तर तिसऱ्या मजल्यापर्यंत रुग्णालयांना परवानगी मिळणार.४व्यावसायिक व रहिवासी असा मिश्र स्वरूपात वापर असेल तर दुसऱ्या मजल्यापर्यंत रुग्णालयांना परवानगी मिळणार.४पार्किंगची क्षमता विचारात घेऊन नर्सिंग होमला परवानगी मिळणार. कमी क्षमता असेल तर पाच बेडपर्यंत रुग्णालयांना परवानगी मिळणार.४शिथिलता प्रदान केल्यानंतर भविष्यात काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी अर्जदारावर राहणार असून, तशा आशयाचे हमीपत्र लिहून घेतले जाणार. आगप्रतिबंधक उपाययोजना४तळमजल्यावर रुग्णालय असेल तर १० बेडपर्यंत त्यांना अग्निनिर्वाणके आवश्यक.४१० बेडपेक्षा जास्त रुग्णालय असेल तर त्यांना आगशोधक/सूचक यंत्रणा अनिवार्य.४पाण्याच्या टाकीसाठी ५० टक्के सवलत. पार्टिशन करून काही भाग राखीव ठेवता येणार.४दुसऱ्या मजल्यावर रुग्णालय असेल तर प्रकरणनिहाय अभ्यास करून निर्णय घेणार.४सुपरस्पेशालिटी अथवा ५० बेडपेक्षा जास्त रुग्णालयांना कोणतीही सवलत नाही. नियमितीकरणासाठी एक खिडकी योजनाआयुक्तांच्या विशेष अधिकारात १० बेडपर्यंतच्या रुग्णालयांना नियमात शिथिलता देण्याचा निर्णय झाल्यानंतर संबंधित रुग्णालयांना आपली प्रकरणे एक खिडकी योजनेत दि. ३१ जुलैपर्यंत सादर करायची आहेत. सदर प्रकरणे दाखल करताना संबंधितांनी वैद्यकीय व नगररचना अशा दोन विभागांसाठी स्वतंत्र फाईल द्यायची असून, अग्निशमन विभाग आणि नगररचना विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच वैद्यकीय विभागामार्फत संबंधित रुग्णालयांना नोंदणी प्रमाणपत्र अथवा त्यांचे नूतनीकरण केले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी दिली. याशिवाय, ज्यांच्याकडे १ ते ५ पर्यंत बेड्स आहेत त्यांनीही नोंदणीसाठी ३१ जुलैपर्यंत फाईल सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अतिरिक्त बांधकाम नियमित : दहा बेडच्या रुग्णालयांना होणार लाभ
By admin | Published: July 06, 2017 12:58 AM