सिन्नर : शहर व उपनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने आमदार राजाभाऊ वाजे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक हेमांगी पाटील यांच्यासोबत चर्चा करून सिन्नर नगरपालिकेस अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात यावा अशी सूचना केली. पळसे येथून येणारी जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने पालिका हद्दीतील पाणीपुरवठा सुमारे आठ दिवसाआड झाला आहे. पालिकेने औद्योगिक विकास महामंडळाकडे दररोज १० लाख लिटर पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. या आशयाचे पत्र पालिकेने आमदार वाजे यांना देऊन औद्योगिक विकास महामंडळास सूचना करण्याची मागणी केली होती. आमदार वाजे यांनी या विषयाची तातडीने दखल घेऊन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत संपर्क साधून सिन्नरच्या पाणीटंचाईची समस्या सांगितली. यावर देसाई यांनी आपण स्वत: लक्ष घालून औद्योगिक विकास महामंडळास सूचना देणार असल्याचे आश्वासन वाजे यांना दिले. वाजे यांनीही प्रादेशिक व्यवस्थापक हेमांगी पाटील यांच्याशी चर्चा करून पालिकेस पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी सूचना केली. (वार्ताहर)
अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याच्या सूचना
By admin | Published: September 16, 2016 10:33 PM